Parth Pawar News: दिल्लीची एण्ट्री ठरली? राज्यसभेसाठी पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब?

Parth Pawar News: सुनेत्रा पवार यांच्या जागी राज्यसभेवर पार्थ पवार यांच्या नावास सहमती दर्शवण्यात आल्याची माहिती समोर आलीय.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Parth Pawar News: पार्थ पवार यांची दिल्लीवारी निश्चित?"
PTI

- सागर कुलकर्णी, प्रतिनिधी

Parth Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) नेत्या सुनेत्रा पवार यांच्या जागी राज्यसभेवर कोण जाणार, याबाबत गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. आता या जागेसाठी पार्थ पवार यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 

(नक्की वाचा: Ajit Pawar Photos: काश वेळ थांबली असती तर... जय पवारांनी वडील अजित पवारांसोबतचे खास फोटो केले शेअर)

पार्थ पवार यांच्या नावावर सहमती?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनसीपीची कोअर टीम आणि मित्रपक्ष भाजपा-शिवसेनेनं (शिंदे गट) पार्थ पवार यांच्या नावास सहमती दर्शवलीय. या सर्वांच्या सहमतीनंच पार्थ पवार यांची राज्यसभा जागेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे. जय पवार यांच्याऐवजी पार्थ पवार यांच्या आग्रही भूमिकेमुळे राज्यसभेवर पार्थ पवार यांचीच वर्णी लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

(नक्की वाचा: Ajit Pawar: 99% गाडीने बारामतीला जायचं ठरलं होतं, मग निधनाच्या आदल्या रात्री काय घडलं? अजित पवारांच्या ड्रायव्हरचा मोठा खुलासा)

Advertisement

दरम्यान यासंदर्भात अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी अंतर्गत पातळीवर हालचालींना वेग आला आहे. लवकरच उमेदवारीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्यसभेच्या या जागेवर अखेर पार्थ पवार यांची वर्णी लागते का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे, सुरुवातीला जय पवार यांचं नाव चर्चेत होते. पण आता वेगळीच घडामोड समोर येतेय. पार्थ पवार यांनी यापूर्वी लोकसभा निवडणूक लढवली आहे, पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.  

सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची घेतली शपथ

अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या विधीमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. यानंतर 31 जानेवारी रोजी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सुनेत्रा यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने त्यांची राज्यसभेची जागा रिक्त झाली. त्यामुळे आता त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.  

Advertisement

Topics mentioned in this article