जाहिरात

Success Story : अकोल्यातील पोरं लय हुश्शार! 'या' 7 जणांनी MPSC परीक्षेत मिळवलं घवघवीत यश, वाचा संघर्षमय कहाणी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्यसेवा परीक्षेत अकोला जिल्ह्याने यंदा उल्लेखनीय यश मिळवत 'अधिकाऱ्यांचा कारखाना'ही ओळख अधिक ठळक केली आहे.

Success Story : अकोल्यातील पोरं लय हुश्शार! 'या' 7 जणांनी MPSC परीक्षेत मिळवलं घवघवीत यश, वाचा संघर्षमय कहाणी
Akola MPSC Students Success Story

Akola MPSC Passing Students News :  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्यसेवा परीक्षेत अकोला जिल्ह्याने यंदा उल्लेखनीय यश मिळवत 'अधिकाऱ्यांचा कारखाना'ही ओळख अधिक ठळक केली आहे. शहरासह ग्रामीण भागातील जिद्दी तरुणांनी मोठ्या प्रमाणात यश संपादन करत विविध उच्च पदांवर आपली छाप उमटवली आहे. अकोल्याच्या सागर कॉलनी येथील प्रीती अरुण उपर्वटची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत "कर सहाय्यक"पदावर निवड झाली.

विशेष म्हणजे प्रीतीने एकाच वेळी दोन स्पर्धा परीक्षा दिल्या होत्या आणि त्या दोन्ही परीक्षांमध्ये ती उत्तीर्ण झाली आहे.त्यापैकी कर सहाय्यक पदासाठी तिची निवड झाल्याने सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.तिच्या या यशामुळे कुटुंबीय,नातेवाईक तसेच पंचक्रोशीतील समाजबांधवांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.प्रीतीची आई गृहिणी असून वडील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक आहेत. कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत मिळवलेले यश अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

अकोल्याच्या प्रगती जगताप यांची मोठी झेप

सहाय्यक आयुक्त पदासाठी निवड दरम्यान महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल ८ एप्रिल रोजी जाहीर झाला असून अकोल्याच्या प्रगती जगताप यांनी उल्लेखनीय यश मिळवत सहाय्यक आयुक्त (गट-अ) पदासाठी निवड मिळवली आहे.अनुसूचित जातीतील महिलांमध्ये राज्यात अव्वल येत त्यांनी अकोल्याचे नाव उज्ज्वल केले आहे.प्रगती जगताप सध्या नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पंचायत समितीत गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

नक्की वाचा >> Solapur News: अशोक खरातने सोलापूरमध्ये काय काय कांड केले? सगळी कुंडली आली समोर, 'ते' प्रकरण खळबळजनकच

२०१७ पासून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करत त्यांनी २०१८ मध्ये कृषी सेवक म्हणून नोकरी स्वीकारली.नोकरी करतानाच अभ्यास सुरू ठेवत त्यांनी एमपीएससीची मुख्य परीक्षा सात वेळा उत्तीर्ण करत मुलाखतीपर्यंत मजल मारली.दरम्यान,२०२४ मध्ये वडील तथा माजी नगरसेवक सुनील जगताप यांच्या निधनाचा धक्का आणि कावीळ आजारावर मात करत त्यांनी हे यश मिळवले. कृषी सेवक ते सहाय्यक आयुक्त असा त्यांचा प्रवास अनेक स्पर्धा परीक्षार्थींसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

अकोल्याच्या पातुर तालुक्यातील शिर्ल्याच्या मामा-भाच्याची प्रेरणादायी कामगिरी एकाचवेळी दोघेही झाले क्लासवन अधिकारी झालेय. दरम्यान,अकोल्याच्या पातूर तालुक्यातील शिर्ला गावातील मामा-भाचा जोडीने एमपीएससी परीक्षेत इतिहास घडवला आहे.राजेंद्र घुगे यांनी एससी प्रवर्गातून बारावा येऊन बीडिओ,तर त्यांचा भाचा प्रतीक पारवेकर यांनी चौथा क्रमांक मिळवत उपविभागीय पोलीस अधिकारी असे एकाचवेळी क्लासवन अधिकारी होण्याचा मान मिळवला.आर्थिक संकटांना तोंड देत आई मालती पारवेकर व भावंडांच्या पाठबळावर या दोघांनी यश मिळवलं.

दरम्यान प्रतिक साहेबराव पारवेकर 2024मध्ये उत्तीर्ण होऊन उपविभागीय पोलीस अधिकारी/सहाय्यक पोलीस आयुक्त (DySP/ ACP)पदी निवड झाली.यादरम्यान दोघांनीही एकाच डब्यात अन्न वाटून खाणारे हे मामा-भाचे आज महाराष्ट्र शासनाचे अधिकारी बनले असून त्यांच्या यशाची सर्वत्र चर्चा आहे. तसेच पातूर तालुक्यातील राहुल लक्ष्मण जामकर यांची राज्यसेवा 2024 परीक्षेत यशस्वी कामगिरी करत सहायक प्रकल्प अधिकारी (गट-ब, राजपत्रित) पदावर निवड झाली आहे.त्यांच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

नक्की वाचा >> Akola News: अकोल्यात 'या' ठिकाणी सुरु होता IPL चा सट्टा, 2 आरोपींनी पोलिसांना सांगितली आतली खबर

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील शेरी वडनेर गावचे अजय पुरुषोत्तम पांडे यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांनी राज्यात 32 वा क्रमांक मिळवत पोलीस उपअधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त पदावर निवड मिळवली आहे.जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी सेठ बन्सीधर विद्यालय,तेल्हारा येथून बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. दहावीला 92टक्के व बारावीला 89 टक्के गुण मिळवत त्यांनी यशाची पायाभरणी केली.कठोर परिश्रम,सातत्यपूर्ण अभ्यास आणि अपयशातून घेतलेल्या धड्यांमुळे त्यांनी हे यश मिळवले.त्यांच्या यशामध्ये कुटुंब,शिक्षक आणि मित्रांचे मोलाचे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.

अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातील गुंजवाडा येथील चेतन प्रभाकर पाखरे यांनी जिद्द आणि सातत्याच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शेतकरी कुटुंबातील चेतन यांनी संत गजानन महाराज इंजिनिअरिंग कॉलेज, शेगाव येथून 2016 मध्ये शिक्षण पूर्ण केले.2020 पासून इंडियन पोस्टमध्ये बीपीएम म्हणून काम करताना त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला.पाच मुख्य परीक्षा व चार मुलाखतीत अपयश आले, तरीही त्यांनी हार मानली नाही.अखेर 2024 मध्ये सहाय्यक गटविकास अधिकारी पद मिळवत त्यांनी यश मिळवले.या यशाचे श्रेय त्यांनी आपल्या कुटुंबीयांना दिले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com