Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण; संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Akshay Shinde Encounter Case: एन्काऊंटरशी संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करणयाचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. विशेष तपास पथक अक्षय शिंदे एन्काऊंट प्रकरणाचा तपास करणार आहे.  

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai News : बदलापूरमधील शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. एन्काऊंटरशी संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करणयाचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. विशेष तपास पथक अक्षय शिंदे एन्काऊंट प्रकरणाचा तपास करणार आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुंबई गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त लखमी गौतम यांच्या देखरेखीखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. सगळ्या बाजूंनी चौकशी करण्याचे उच्च न्यायालयाने दिले आहेत.

मात्र या आदेशाला स्थगिती देण्याची राज्य सरकारची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी राज्य सरकारने आदेशावर स्थगितीची मागणी केली होती.

(नक्की वाचा-  शेअर बाजार धडाम, गुंतवणूकदारांनी 17 लाख कोटी गमावले; घसरणीची 5 कारणे)

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर त्याच्या वडिलांनी याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावेळी अक्षय शिंदे याच्या वडिलांनी  पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. अक्षयचा एन्काऊंटर नसून नियोजनबद्ध कट आहे, असा दावा त्यांनी केला होता. 

Advertisement

(नक्की वाचा- Gold Rates : सोन्याची किंमत 57 हजारांवर येणार? गुंतवणूकदारांची होणार चांदी, काय आहे कारण?)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर हा फेक असून यासाठी पाच पोलीस जबाबदार असल्याचा दावा करण्यात आला होता. पोलिसांनी अक्षय शिंदेंने गोळीबार केल्यानंतर स्वसंरक्षणार्थ त्याच्यावर गोळ्या झाडल्या, ज्यामध्ये आरोपीचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. मात्र पोलिसांनी दावा केलेल्या बंदुकीवर अक्षयच्या हाताचे ठसे आढळले नसल्याचे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे पोलिसांचा हा दावा खोटा ठरला. 

Topics mentioned in this article