काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हिंदूंबाबत लोकसभेत केलेल्या वक्तव्याचे पडसाद विधानपरिषदेत पाहायला मिळाले. विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजप आमदार प्रसाद यांनी एकमेकांना शिवीगाळ केल्याची प्रकार विधानपरिषदेत घडला आहे.
प्रसाद लाड यांनी राहुल गांधी यांच्या वक्त्यव्याचा मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित केला. मात्र लोकसभेत केलेल्या वक्तव्याची विधानपरिषदेत चर्चा करायला हवी का? अशी भूमिका अंबादास दानवे यांनी मांडली. मात्र दानवे बोलत असताना प्रसाद लाड यांनी त्यांच्याकडे हातवारे करुन याचा विरोध केला. त्यावेळी अंबादास दानवे यांना माझ्याकडे हात करायचा नाही, असं म्हणत प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली.
सभागृहात नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
मला अजिबात पश्चाताप नाही- दानवे
माझा तोल गेलेला नाही. माझ्याकडे कुणी बोट दाखवून बोलले तर मी बोट तोडणार. प्रसाद लाडसारखा माणूस मला हिंदुत्व शिकवणार का? लोकसभेतील राहुल गांधी यांच्या वक्तव्याबाबत विधानपरिषदेत चर्चा करायला हवी का? अशी विचारणा मी विधानपरिषद सभापतींना केली. त्यांनी याबाबत उत्तर देणे अपेक्षित होते. प्रसाद लाड यांनी सभापतींशी बोलणे गरजेचे होते. माझ्याकडे हातवारे करून माझ्यासी बोलण्याची गरज नव्हती. मला माझ्या वक्तव्याचा अजिबात पश्चाताप नाही, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी केली. माझा राजीनाम्याची मागणी करत आहे. मात्र माझा राजीनामा मागण्याची मागण्याचा अधिकार केवळ माझ्या पक्षप्रमुखांना आहे, असंही अंबादास दानवे यांनी म्हटलं.
अंबादास दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध - प्रसाद लाड
राहुल गांधी यांनी लोकसभेत केलेल्या वक्तव्याचा मुद्दा सभागृहात मांडण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना सभागृहात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यामुळे सभागृह तहकूब केले गेले. यावेळी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेधाचा ठराव करुन लोकसभेत पाठवण्याची मागणी मी केली. मात्र अंबादास दानवे बोलायला उठले त्यावेळी माझं भाषण सुरु होते. त्यावेळी ते माझ्याशी अर्वाच्च भाषेत बोलले. तिथे त्यांना आई-बहिणीवरुन मला शिव्या दिल्या. हिंदूंचा अपमान करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, मी त्याचा निषेध करतो, असं प्रसाद लाड यांनी म्हटलं.