अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा, जिल्हा परिषद विद्यार्थ्यांचा फोटो शेअर करत म्हटलं...

शाळा सुरु होऊन चार महिने उलटले तरी लाखो विद्यार्थ्यांना अजून गणवेश मिळाला नाही. ज्यांना गणवेश मिळाले त्याची गुणवत्ता देखील खराब असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलं. 

Advertisement
Read Time: 1 min

जिल्हा परिषद शाळेच्या  विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या गणवेशावरून पुन्हा एकदा विरोधी पक्षाने सरकारवर निशाणा साधला आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. अंबादास दानवे यांनी एका विद्यार्थ्यांचा फोटो ट्वीट करत, विद्यार्थ्यांच्या गणवेशाची  दुरावस्था सर्वांसमोर मांडली आहे. शाळा सुरु होऊन चार महिने उलटले तरी लाखो विद्यार्थ्यांना अजून गणवेश मिळाला नाही. ज्यांना गणवेश मिळाले त्याची गुणवत्ता देखील खराब असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलं. 

अंबादास दानवे यांना ट्वीट करत म्हटलं की, "या चिमुकल्याने घातलेला गणवेश प्रतिबिंब आहे. महाराष्ट्रातील त्रांगडे सरकारचे! पहिल्याची बाही दुसऱ्याच्या शर्टाला, दुसऱ्याचा खिसा तिसऱ्याच्या पॅन्ट ला.. काय ही विद्यार्थ्यांची चेष्टा शिक्षणमंत्री दीपक केसरकरजी विद्यार्थी हा प्रयोगशाळेत शिकावा, तुम्ही तर त्याचीच प्रयोगशाळा करून ठेवली आहे." 

15 ऑगस्ट 2024 पर्यंत 45 लाख विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची डेडलाईन असताना सप्टेंबर संपला तरी केवळ 24 लाख विद्यार्थ्यांना गणवेश दिले गेले आहेत. ते ही हे असले बोगस! कपड्याचा धड दर्जाही पाळण्यात आलेला नाही, न शिवण धडाची! हापापाचा माल गपापा करण्याच्या सर्व मर्यादा या सरकारने ओलांडल्या आहेत. त्यातून शालेय विद्यार्थ्यांचे गणवेशही सुटलेले नाहीत, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे. 

Topics mentioned in this article