Ambedkar Jayanti 2025 : चैत्यभूमीवर एकनाथ शिंदेंचं भाषण ऐनवेळी रोखलं, नेमकं काय घडलं?

Dr, Babasaheb Ambedkar Jayanti 2025 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या या अभिवादन सभेत दरवर्षी राजशिष्टाचारानुसार भाषणांचा क्रम असतो  आणि त्यानुसार भाषणं होतात.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai News : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर देखील राज्य सरकारकडून अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होते. मात्र येथे राजकीय नाट्य पाहायला मिळाल. अभिवादन सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाषण करण्यापासून रोखल्याचा प्रकार घडला आहे.  त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाषण करण्यापासून कुणी रोखलं? याची चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राजशिष्टाचारानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण नियोजित होतं. एकनाथ शिंदे यांचं भाषण देखील तयार होतं. मात्र पण ऐनवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाषण करण्यापासून रोखण्यात आलं. त्यानंतर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच भाषण नियोजित करण्यात आलं. चैत्यभूमीवरील अभिवादन सभेत राजशिष्टाचारानुसार भाषण नाकारल्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री नाराज असल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती आहे 

(नक्की वाचा- जगात गाजा वाजा....! 14 एप्रिल न्यूयॉर्कमध्ये 'आंबेडकर दिवस' घोषित)

चैत्यभूमीवरील अभिवादन सभेचं आयोजन मुंबई महापालिका आणि चैत्यभूमी व्यवस्थापन समितीमार्फत दरवर्षी करण्यात येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या या अभिवादन सभेत दरवर्षी राजशिष्टाचारानुसार भाषणांचा क्रम असतो  आणि त्यानुसार भाषणं होतात. मात्र यंदा फक्त राज्यपाल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच भाषणं झाली. 

(नक्की वाचा-  Shivsena News : बाळासाहेब ठाकरे पुन्हा शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार, ठाकरे गटाचा मास्टर प्लॅन ठरला)

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची राज्यघटना लिहिली आणि याच राज्यघटनेतील राजशिष्टाचाराचे उल्लंघन आज चैत्यभूमीवर राजशिष्टाचार विभागाकडून झाले का? ऐन व्यासपीठावर उपमुख्यमंत्री उपस्थित असतानाच त्यांचा अधिकार डावलण्याची हिंमत कोणत्या अधिकाऱ्याने कोणाच्या इशाऱ्यावरून केली? याची चौकशी होणार का? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. 

Advertisement

Topics mentioned in this article