
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती केवळ भारतातच नाही तर जगभरात साजरी केली जात आहे. त्यानिमित्ताने न्यूयॉर्कचे महापौर एरिक अॅडम्स यांनी 14 एप्रिल हा दिवस डॉ. भीमराव आंबेडकर दिवस म्हणून घोषित केला आहे. हा दिवस भारतीय संविधानाचे शिल्पकार, समाजसुधारक आणि मानवाधिकारांचे प्रणेते डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जाईल. महापौर अॅडम्स यांनी आपल्या घोषणेत बाबासाहेबांच्या "शिका, संघटित व्हा, संघर्ष करा" या संदेशाचा उल्लेख करत त्यांचे अर्थशास्त्रज्ञ, राजकीय नेते आणि समाजसुधारक म्हणून योगदान अधोरेखित केले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विशेष म्हणजे ही घोषणा न्यूयॉर्क शहराच्या इतिहासात प्रथमच झाली असून यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आणि विचारांचा जागतिक स्तरावर सन्मान होत आहे. बाबासाहेबांनी न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतले होतं. सामाजिक परिवर्तनाच्या आणि समतेच्या विचारांना या शिक्षणामुळं अधिक बळ मिळालं. आणि आज त्याच शहरात बाबासाहेबांचा जन्मदिवस डॉ. भीमराव आंबेडकर दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे.
#WATCH | New York, USA | Mayor of the city of New York, Eric Adams, signs the proclamation to declare April 14 as Dr Bhimrao Ramji Ambedkar Day in honour of Babasaheb Ambedkar. pic.twitter.com/XDsqqnhtDb
— ANI (@ANI) April 13, 2025
ही घोषणा भारत आणि जगभरातील आंबेडकरवादी चळवळीतील लोकांसाठी अभिमानाची बाब आहे. न्यूयॉर्कसारख्या आंतरराष्ट्रीय शहरात हा दिवस साजरा होणे, बाबासाहेबांच्या समता, न्याय आणि मानवाधिकार यासाठीच्या लढ्याला वैश्विक मान्यता मिळाल्याचं द्योतक असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world