जाहिरात

Ambernath News: 12 व्या मजल्यावरून ढकललं, परस्पर दफन करण्याचा ही प्रयत्न, पण तिसऱ्या डोळ्यामुळे गेम खल्लास

हा सर्व प्रकार तिथे असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Ambernath News: 12 व्या मजल्यावरून ढकललं, परस्पर दफन करण्याचा ही प्रयत्न, पण तिसऱ्या डोळ्यामुळे गेम खल्लास
अंबरनाथ:

अमजद खान 

क्रूरतेचा कळस काय असू शकतो याचं जिवंत उदाहरण समोर आलं आहे. अंबरनाथमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेनंतर  एसीपी पासून उपायुक्तांपर्यंत सर्व जण अॅक्शन मोडवर आले आहेत. अंबरनाथमध्यल्या एका सोसायटीत एका मांजरीला बाराव्या मजल्यावरून ढकलून दिल्याचा प्रकार घडला होता. यात मांजरीचा मृत्यू झाला. शिवाय या मांजलीला गुपचूप दफन करण्याचा डाव ही उधळण्यात आला. ही सर्व घटना एका सीसीटीव्ही मुळे समोर आली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी मांजरीला ढकलणाऱ्या इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र त्याला अद्यापही अटक करण्यात आलेली नाही.

अंबरनाथच्या पालेगाव परिसरातील रॉयल फ्लोरा ही बहुमजली इमारत आहे.  इमारतीत 26 जुलै रोजी सकाळी पावणेसहा वाजता हा प्रकार घडला. मांजर इमारतीच्या कठड्यावर होती. त्यावेळी तिथे एक व्यक्ती हळूच आला. मांजर इमारतीच्या बाराव्या मजल्यावरील कठड्यावर होती. तिथे तो व्यक्ती आला. त्याने तिथून थेट त्या मांजरीला धक्का देत खाली ढकलून दिले. यात मांजरीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र हे क्रुर कृत्य करताना सर्व काही सीसीटीव्हीत कैद झाले होते. याचे भान त्या व्यक्तीला राहीले नाही. 

नक्की वाचा - Kalyan News: 'तडीपार करा पण मला जेलमधून बाहेर काढा',मारकुटा रमेश म्हात्रे कोर्टात असं का म्हणाला?

ही सर्व प्रकार तिथे असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्यानंतर  प्राणीमित्र भडकले आहेत.  त्यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी मांजरीला ढकलणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र अजूनही त्याला अटक करण्यात आलेली नाही. या व्यक्तीचा मुलगा हा सोसायटीच्या कमिटीवर आहे.  त्यामुळेच सोसायटीकडून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर संबंधीतावर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. 

नक्की वाचा - Neet Love Story: आंदोलनासाठी गेले लग्न करून परत आले! जंतर-मंतरवरची 'नीट' प्रेम कहाणी, Video होतोय व्हायरल

हा गुन्हा लपवण्यासाठी सोसायटीने मृत मांजरीला परस्पर दफन करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्राणिमित्रांनी मांजरीला पुन्हा बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवलं आहे. या सगळ्या प्रकरणी आता शिवाजीनगर पोलीस मांजरीला ढकलणाऱ्या व्यक्तीला अटक कधी करतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी सांगितलं आहे. एखाद्या प्राण्या सोबत असं कोणी करू शकतं का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. 
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com