योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola Fire Incident : अकोल्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. अकोल्याच्या देशमुख फाईल परिसरात शॉर्टसर्किटमुळे आज दुपारी एका घराला अचानक आग लागली. या आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झालं. धक्कादायक म्हणजे, एक वृद्ध महिला या आगीत अडकल्याने ती दहा ते पंधरा टक्के भाजली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांनी तातडीनं अग्निशामक दल व रुग्णवाहिकेला कॉल केला.
त्यानंतर महानगरपालिकेची अग्निशामक गाडी घटनास्थळी पोहोचली. परंतु, आरोग्य विभागाची रुग्णावाहिका घटनास्थळापासून दहा मिनिटांच्या अंतरावर असून सुद्धा या ठिकाणी पोहोचली नाही. त्यामुळे आरोग्या विभागाचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे आरोग्य विभागावर नागरिकांनी सडकून टीका केली आहे.
रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली नाही, नागरिकांमध्ये संताप
मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्याच्या देशमुख फाईल परिसरात शॉर्टसर्किटमुळे एका घराला आग लागल्याची घटना घडली होती. या आगीच्या घटनेत एक वयोवृद्ध महिला जखमी झाली. येथील ग्रामस्थांनी घटनेची माहिती महानगरपालिका आणि आग्निशामक दलाल दिली. पण घटनास्थळी फक्त अग्निशामक दलाची गाडीच तिथे पोहोचली. रुग्णावाहिका न आल्याने नागरिकांचा एकच संताप उडाला.
नक्की वाचा >> Shocking News : कांद्यावर औषध फवारणीसाठी शेतात गेली, पती सोबत असतानाच महिलेचा जागीच मृत्यू! काय घडलं?
त्यानंतर येथील नागरिकांनी जखमी महिलेला ऑटो-रिक्षातून रुग्णालयात उपचारासाठी नेलं. रुग्णवाहिकेच्या विलंबाबद्दल संतप्त नागरिकांनी प्रशासनावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेची दखल नागपूरच्य विधिमंडळ अधिवेशनात घेतली जाणार का? असा प्रश्नही येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे.