Ashok Kharat: वायग्रा मिश्रित ओश्नो जल काय? जे घेण्यासाठी नेत्यांची रांग लागायची; दमानियांचे खळबळजनक आरोप

Anjali Damania on Ashok Kharat: अंजली दमानिया यांनी अशोक खरातवर वायग्रा मिश्रित 'ओश्नो जल' विकल्याचा आणि हिप्नोसिसद्वारे लोकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Ashok Kharat Case Update: नाशिकच्या अशोक खरात प्रकरणात आता डोकं सुन्न करणारी माहिती समोर येत आहे. हे प्रकरण केवळ लैंगिक शोषणापुरते मर्यादित नसून, यात ड्रग्ज, संमोहन (Hypnosis) आणि राजकीय वरदहस्ताचा मोठा समावेश असल्याचे समोर येत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत अनेक गोष्टी उघड केल्या आहेत.  अशोक खरातने 'ओश्नो जल' आणि 'सिद्ध प्रे'च्या नावाखाली एक मोठे जाळे विणले होते, अशा माहिती देखील खरातने समोर आणली आहे.

'ओश्नो जल'चे धक्कादायक वास्तव

अंजली दमानिया यांच्या दाव्यानुसार, अशोक खरात एक विशेष प्रकारचे पाणी तयार करायचा, ज्याला तो 'ओश्नो जल' म्हणायचा.  हे जल म्हणजे प्रत्यक्षात कफ सिरप, पाणी आणि कुटून टाकलेली 'वायग्रा' (Viagra) गोळ्यांचे मिश्रण असायचे. हे ओश्नो जल मिळवण्यासाठी महाराष्ट्रातील विविध पक्षांचे नेते आपल्या गाड्या आणि चक्क हेलिकॉप्टर अशोक खरातकडे पाठवायचे. यात तिरुपती बालाजी ट्रस्टच्या एका ट्रस्टीचाही समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणात केवळ एका पक्षाचे नाही, तर अनेक पक्षांमधील नेते आहेत.

Advertisement

(नक्की वाचा-  Ashok Kharat: अशोक खरात प्रकरण; रूपाली चाकणकरांच्या व्हायरल व्हिडीओ खळबळ, राजकारण पेटलं)

'सिद्ध प्रे' आणि हिप्नोसिसचा बनाव

लोकांना भारावून टाकण्यासाठी खरात दोन प्रकारच्या 'साधना' करत असे.

  • ओश्नो प्रे: यात 'ओम ईशान्येश्वराय नम:' हा जप 11 वेळा करायला सांगितला जायचा. श्रावणात आणि महाशिवरात्रीला शंकराच्या पिंडीवरील हंडा हलायला लावून लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा बनाव रचला जायचा.
  • सिद्ध प्रे: होम-हवन दरम्यान लोकांना सापाचे आवाज ऐकू येणे किंवा विचित्र आकार दिसणे, असे अनुभव यायचे. दमानिया यांच्या मते, हा सर्व हिप्नोसिसचा (संमोहन) प्रकार होता, ज्याद्वारे तो लोकांना आपल्या नियंत्रणात ठेवायचा.

(नक्की वाचा-  Pune Petrol Price Hike: इराण-इस्रायल युद्धाचा पुण्याला फटका; पेट्रोलच्या दरात मोठी वाढ)

मुंबईतील डेप्युटी कलेक्टरची साथ आणि आर्थिक लागेबांधे

अंजली दमानिया यांनी प्रशासनातील एका बड्या अधिकाऱ्याकडेही बोट दाखवले आहे. मुंबईतील एक डेप्युटी कलेक्टर खरातला सतत मदत करत आहेत. ते खरातला पैसे आणि वकील पुरवत असून त्यांचे आर्थिक संबंध असल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे.

अशोक खरात श्रीमंतांकडून 'ओश्नो जल' आणि साधना यातून पैसे उकळायचे आणि मध्यमवर्गीय व गरीब महिलांचे लैंगिक शोषण करायचा, अशी खरातची कार्यपद्धती होती, असं अंजली दमानिया यांनी सांगितलं.