यशपाल सोनकांबळे, पुणे
Pune Petrol Price Hike: मध्यपूर्वेत इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष तीव्र झाल्याचा थेट परिणाम पुण्याच्या इंधन दरांवर झाला आहे. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत झालेल्या वाढीमुळे पेट्रोलियम कंपन्यांनी प्रीमियम पेट्रोलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून म्हणजेच 20 मार्च 2026 पासून पुणेकरांना प्रीमियम पेट्रोलसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
पुण्यातील नवे इंधन दर
पेट्रोलियम कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'स्पीड' आणि 'पॉवर' यांसारख्या प्रीमियम पेट्रोलच्या दरात बदल झाले आहेत. ‘स्पीड/पॉवर' प्रीमियम पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 2.09 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी या पेट्रोलचा दर 111.68 रुपये प्रति लिटर होता, तो आता 113.77 रुपये प्रति लिटर करण्यात आला आहे.
(नक्की वाचा- Ashok Kharat: कॅप्टन' खरातची चिंधीगिरी! कोट्यवधींची माया पण गरीब शेतकऱ्याला फसवलं; खळबळजनक आरोप)
- जुना दर: 111.68 रुपये प्रति लिटर
- वाढ: 2.09 रुपये प्रति लिटर
- नवा दर: 113.77 रुपये प्रति लिटर
दरवाढीचे मुख्य कारण
दरवाढीमागे जागतिक पातळीवरील कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी वाढ कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. मध्यपूर्वेत इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष तीव्र झाल्याने तेल उत्पादन व पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. या संघर्षात ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले झाल्यामुळे जागतिक तेल बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे.
(नक्की वाचा- VIDEO : गुडी पाडवा शोभायात्रेत चमकोगिरी नडली; पोलिसांनी तरुणीची शायनिंग गर्दीसमोरच जिरवली!)
आगामी काळात दरवाढ अटळ?
तज्ज्ञांच्या मते, होर्मुझ सामुद्रधुनीत अडथळे निर्माण झाल्यास जागतिक तेल पुरवठ्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, कारण जगातील सुमारे 20 टक्के तेल वाहतूक या मार्गाने होते. यामुळे भारतासह अनेक देशांमध्ये इंधन दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, आगामी काळात सर्वसामान्यांच्या खिशावर याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world