Pune News : 2 महिन्यापूर्वी ओपनिंग अन् आता हातोडा, विमाननगरमधील प्रसिद्ध 'द रामेश्वरम कॅफे'वर पालिकेची कारवाई

Rameshwaram Cafe in Viman Nagar : पुण्यातील विमाननगर परिसरात डिसेंबर २०२५ मध्ये सुरू झालेलं प्रसिद्ध 'द रामेश्वर कॅफे'वर पालिकेने कारवाई केल्याचं समोर आलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Rameshwaram Cafe in Viman Nagar : पुण्यातील विमाननगर परिसरात डिसेंबर २०२५ मध्ये सुरू झालेलं प्रसिद्ध 'द रामेश्वरम कॅफे'वर पालिकेने कारवाई केल्याचं समोर आलं आहे. 'द रामेश्वरम कॅफे'कडून दुकानासमोरील सार्वजनिक फ्रंट मार्जिनचा अनधिकृतपणे वापर केल्याची गेल्या काही दिवसांपासून स्थानिकांमध्ये चर्चा सुरू होती. त्यावरुन पुणे महानगरपालिकेवर ताशेरे ओढले जात होते. दरम्यान अखेर पुणे पालिकेने याविरोधात कारवाई केली आहे.

२ महिन्यांपूर्वी सुरुवात अन् आता कारवाई

डिसेंबर २०२५ मध्येच पुण्यातील विमाननगर भागात 'द रामेश्वरम कॅफे'चं ओपनिंग करण्यात आलं होतं. त्यानंतर अवघ्या दोन ते अडीच महिन्यात पुणे पालिकेने या कॅफेविरोधात कारवाई केली आहे. 'द रामेश्वरम कॅफे' हे बंगळुरूतील प्रसिद्ध कॅफेची साखळी आहे. पुण्यात या कॅफेची चेन सुरू झाल्यानंतर पुणेकरांकडून आनंद व्यक्त करण्यात आला होता. दाक्षिणात्य चवीचे पदार्थ खाण्यासाठी या कॅफेमध्ये नियमित मोठी गर्दी असते.

नक्की वाचा - Pune News : विषारी धुरामुळे पुण्यातील 20,000 विद्यार्थ्यांना सुट्टी, 5 जणांना रुग्णालयात हलवलं; एक कंपनी बंद

दरम्यान या कॅफेकडून सार्वजनिक जागेचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून करण्यात आल्या होत्या. याची दखल घेत पुणे महानगरपालिकेने 'द रामेश्वरम कॅफे'वर कारवाई केली असून कॅफेच्या समोर बसण्यासाठी करण्यात आलेली व्यवस्था तोडण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ६५०० हून अधिक चौरस फूट जागेवर तोडफोड करण्यात आली आहे.