Badlapur News : 'तुम्हीच मला कटोरा द्या, मी भीक मागतो'; बदलापुरातील अतिक्रमण विरोधी कारवाई वादात

गेल्या काही दिवसांपासून बदलापूर नगरपरिषद प्रशासनाकडून अनधिकृत बांधकामाविरोधात धडक कारवाई सुरू आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

Badlapur Encroachment : गेल्या काही दिवसांपासून बदलापूर नगरपरिषद प्रशासनाकडून अनधिकृत बांधकामाविरोधात धडक कारवाई सुरू आहे. बदलापूर नगरपालिका प्रशासनानं अनधिकृत बांधकामांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. आज पालिकेमार्फत अंबरनाथ-बदलापूर हायवे तसेच पनवेल हायवे लगतची अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईमुळे अनधिकृत बांधकामं करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

नगरपरिषदेकडून नोटीस न देता कारवाई? 


 
दरम्यान बदलापूर शहरात कुळगाव–बदलापूर नगर परिषदेची अतिक्रमण कारवाई वादात सापडली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार  बदलापूरमध्ये ४३१ अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर नगर परिषद ॲक्शन मोडवर आली. मात्र कारवाईदरम्यान काहींना नोटीस देण्यात आली, तर काहींवर नोटीस न देता थेट कारवाई करण्यात आली. यामुळे अनेक छोट्या व्यावसायिकांचा उपजीविकेचा आधार उद्ध्वस्त झाला. याच पार्श्वभूमीवर एका पीडित व्यावसायिकाने नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांना थेट सवाल केला.

Advertisement

नक्की वाचा - Badlapur News : 35 हजारांचा Wardrobe अवघ्या 18 हजारात; बदलापुरकरांची मोठी झुंबड

छोट्या व्यवसायिकांचा नगराध्यक्षांना सवाल...

“मी आज बेरोजगार झालो आहे. माझं कुटुंब उद्ध्वस्त  झालं आहे. आता तुम्हीच मला कटोरा द्या मी भीक मागतो,” असा आक्रोश त्या व्यावसायिकाने केला. नोटीसशिवाय झालेल्या कारवाईवर आता गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या सर्व प्रकरणानंतर पुढील 8 दिवसांसाठी कारवाई स्थगित करण्यात आली आहे. 

Topics mentioned in this article