
राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मंत्रिमंडळ बैठकीत जनहिताच्या दृष्टीने 8 निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आले. सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मान्यता आजच्या बैठकीत देण्यात आली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याशिवाय डान्स बार कायदा सुधारणांबाबतही मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली. सुप्रीम कोर्टाने सुचवलेल्या सूचनांनुसार कायद्यात सुधारण केल्या जाणार आहेत. येत्या अधिवेशनात नवीन सुधारणा केलेला कायदा मंजूर केला जाणार आहे.
(नक्की वाचा- Crime News : 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' भाषणासाठी विद्यार्थिनीला पुरस्कार, काही दिवसात शिक्षकानेच केला अत्याचार)
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय
- कृष्णा-कोयना उपसा सिंचन योजनेतील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यास तसेच योजनेची ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्यासाठी 1594.09 कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता. या योजनेतून अवर्षण प्रवण भागात 1,08,197 हेक्टर क्षेत्राला लाभ (जलसंपदा विभाग)
- अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्ससाठी (एएनटीएफ) एकूण 346 नवीन पदे निर्माण करण्यास मंजुरी, यासाठी 22.37 कोटी रुपये इतका निधी खर्च करणार (गृह विभाग)
- सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मान्यता (वित्त विभाग)
- राज्यातील रोपवेची कामे राष्ट्रीय राज्यमार्ग लॉजिस्टीक व्यवस्थापन लि. (एनएचएलएमएल) मार्फत करण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय (सार्वजनिक बांधकाम विभाग)
- जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे लोंढे मध्यम प्रकल्पाला 1275.78 कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता. चाळीसगाव, भडगाव तालुक्यातील 8290 हेक्टर क्षेत्राला सिंचन मिळणार (जलसंपदा विभाग)
- मौजे एरंडवणा, पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला जागा नाममात्र 1 रुपयात शासकीय जमीन (महसूल व वन विभाग)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
Cabinet Meeting, Cabinet Meeting Decision Today, मंत्रिमंडळ बैठक, मंत्रिमंडळ बैठक निर्णय, देवेंद्र फडणवीस