Exclusive: अशोक खरात प्रकरणात अत्यंत धक्कादायक माहिती; नाशिकचे नामांकित डॉक्टर रडारवर, कारण...

Ashok Kharat Case Update: अशोक खरात प्रकरणाला आता एक अत्यंत धक्कादायक वळण मिळाले असून, नाशिकमधील काही नामांकित डॉक्टर एसआयटीच्या (SIT) रडारवर आले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

Ashok Kharat Case Update: महाराष्ट्र हादरवून सोडणाऱ्या अशोक खरात प्रकरणात अत्यंत धक्कादायक खुलासा झाला आहे. नाशिकमधील काही प्रतिष्ठित डॉक्टर या गुन्ह्यात सामील असल्याचे संकेत मिळत असून, त्यांच्यावर विशेष तपास पथकाची (SIT) करडी नजर आहे. 'NDTV मराठी'ला मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार, या प्रकरणात अत्यंत गंभीर आणि संतापजनक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

औषधांच्या सहाय्याने महिलांवर नियंत्रण?

तपास यंत्रणांना संशय आहे की, पीडित महिलांना आपल्या जाळ्यात ठेवण्यासाठी अशोक खरात हा काही डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधांचा वापर करत होता. यामध्ये दोन प्रमुख मुद्दे समोर येत आहेत. महिलांना गर्भधारणा होऊ नये म्हणून त्यांना डॉक्टरांच्या सांगण्यावरून काही गोळ्या किंवा औषधे दिली जात होती का? याचा तपास आता सुरू झाला आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  Crime News: बीड हादरलं! प्रेम प्रकरणातून तरुणाला झाडाला बांधून मारहाण; त्यानंतर जे घडलं...)

तसेच महिलांना आपल्या नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा त्यांना संमोहित करण्यासाठी काही विशिष्ट औषधांचा वापर केला जात होता का? हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

नाशिकच्या डॉक्टरांचे धाबे दणाणले

या प्रकरणात नाशिकमधील काही मोठ्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. जर डॉक्टरांनी खरातला असे बेकायदेशीर कृत्य करण्यासाठी औषधे पुरवली असतील किंवा सल्ला दिला असेल, तर त्यांच्यावरही कठोर फौजदारी कारवाई होऊ शकते. एसआयटीने काही डॉक्टरांची यादी तयार केली असून लवकरच त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

(नक्की वाचा-  Solapur News: करमाळ्यातून अचानक गायब होत आहेत मुली-महिला; तालुक्यात भीतीचं वातावरण!)

तपासात आणखी मोठे खुलासे होणार?

एसआयटीच्या तपासात याआधीच अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्या आहेत. मात्र, आता हा तपास वैद्यकीय क्षेत्राकडे वळल्याने या गुन्ह्याचे स्वरूप अधिक गंभीर झाले आहे. महिलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या  या रॅकेटमध्ये नेमके कोण-कोण सहभागी आहेत, याचा लवकरच उलगडा होण्याची चिन्हे आहेत.