जाहिरात

Ashok Kharat Case: अशोक खरात महिलांना जाळ्यात कसा ओढायचा? चौकशीत खळबळजनक खुलासा

Ashok Kharat Case: अशोक खरात याच्या चौकशीत एसआयटीला (SIT) धक्कादायक माहिती मिळाली आहे. वशीकरण किंवा चमत्कार नव्हे, तर विज्ञानातील काही ट्रिक्स आणि हातचलाखीचा वापर करून खरात महिलांना आपल्या जाळ्यात ओढत होता.

Ashok Kharat Case: अशोक खरात महिलांना जाळ्यात कसा ओढायचा? चौकशीत खळबळजनक खुलासा

राहुल वाघ, नाशिक

Ashok Kharat Case: भोंदूबाबा अशोक खरात याच्या चौकशीतून अनेक गोष्टी हळूहळू समोर येत आहेत. विशेष तपास पथकाच्या (SIT) चौकशीत खरातने कबुली दिली आहे की, तो कोणताही चमत्कार किंवा वशीकरण करत नव्हता, तर निव्वळ हातचलाखी आणि विज्ञानातील काही साध्या ट्रिक्स वापरून महिलांना प्रभावित करत होता. या ट्रिक्सच्या जोरावर त्याने अनेक महिलांना आकर्षित करून त्यांचे शारीरिक आणि मानसिक शोषण केल्याचे आता समोर आले आहे.

विज्ञानाच्या नावाखाली फसवणुकीचे 'जाळे'

अशोक खरात हा अत्यंत चलाखीने लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास करायचा. चौकशी दरम्यान समोर आलेली महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी तो विज्ञानातील काही प्रयोगांचा वापर करायचा आणि त्याला 'दैवी शक्ती' किंवा 'चमत्कार' असे नाव द्यायचा.

(नक्की वाचा-  Kalyan-Dombivli Schools: कल्याण-डोंबिवलीतील अनधिकृत शाळांची यादी जाहीर, पालकांमध्ये चिंतेचं वातावरण)

संकटात असलेल्या किंवा मानसिकदृष्ट्या खचलेल्या महिलांची माहिती काढून, त्यांच्या कमकुवतपणाचा फायदा घेऊन तो त्यांना वश करायचा.एकदा का महिला त्याच्या प्रभावाखाली आली की, तिला धमकावून किंवा भुरळ घालून तो तिचे लैंगिक शोषण करत असे.

"दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये"

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान पोलिसांना दिलेल्या उत्तरात खरातने म्हटले की, "दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये". या विधानातून त्याची गुन्हेगारी प्रवृत्ती आणि लोकांच्या भोळेपणाचा त्याने घेतलेला फायदा स्पष्टपणे दिसून येत आहे.

(नक्की वाचा-  Nagpur News: जनगणनेचे काम नाकारणाऱ्या शिक्षकांवर नागपुरात गुन्हे दाखल होणार; महापालिका प्रशासनाचा मोठा निर्णय)

SIT कडून सखोल तपास सुरू

या गुन्ह्यात खरातला कोणी कोणी मदत केली, याकडे एसआयटीने आता लक्ष केंद्रित केले आहे. विज्ञानाचे प्रयोग किंवा हातचलाखी शिकवण्यासाठी आणि साहित्य पुरवण्यासाठी त्याला कोणाचे सहकार्य मिळाले, याचा तपास सुरू आहे. खरातच्या आश्रमातून काही रासायनिक पदार्थ आणि तांत्रिक उपकरणे जप्त करण्यात आल्याची माहिती आहे, ज्याचा वापर तो 'चमत्कार' दाखवण्यासाठी करायचा.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com