Ashok Kharat: गणितात मठ्ठ, भाषांचीही बोंब, भोंदूबाबाचा दहावीची रिझल्ट आला समोर, नावंही बदललं!

Ashok Kharat case Update: स्वतःला अंकशास्त्रज्ञ म्हणवून घेणारा अशोक खरात दहावीत गणितात नापास झाला होता. सिन्नरच्या वावी येथील शाळेचा विद्यार्थी असलेल्या खरातने केवळ 35.88 टक्के गुण मिळवून दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins

नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात ऊर्फ 'कॅप्टन' याच्याबद्दल नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. स्वतःला 'अंकशास्त्र' तज्ज्ञ (Numerologist) म्हणवून घेणारा खरात प्रत्यक्षात शालेय जीवनात गणितात नापास होता, अशी माहिती तपासात उघड झाली आहे.

नाशिकच्या एसआयटी (SIT) तपासात अशोक खरातच्या भूतकाळातील अनेक पाने उलगडली जात आहेत. स्वतःला उच्चशिक्षित आणि दैवी शक्ती असलेला दाखवणारा खरात शालेय जीवनात अत्यंत सामान्य विद्यार्थी होता आणि गणितासारख्या विषयात तर तो जेमतेम होता, हे आता स्पष्ट झाले आहे.

Advertisement

लक्ष्मण ते अशोक... नावात बदल 

शाळेच्या रेकॉर्डनुसार अशोक खरातचे नाव लक्ष्मण खरात असे होते. पुढे त्याने आपले नाव बदलून अशोक खरात केले. तो सिन्नर तालुक्यातील वावी येथील एका माध्यमिक शाळेचा विद्यार्थी होता. खरातला दहावीच्या परीक्षेत एकूण 700 पैकी केवळ 251 गुण मिळाले होते. त्याची टक्केवारी अवघी 35.88% इतकी होती.

(नक्की वाचा-  Pune News: अंडरग्राउंट मेट्रोच्या वर बोअर मारल्याचा प्रकार; महामेट्रोचं मोठं नुकसान, गुन्हा दाखल)

Ashok Kharat SSC result

खरातच्या दहावीच्या गुणांची आकडेवारी

  • गणित: 28 गुण (नापास)
  • मराठी: 39 गुण
  • इंग्रजी: 37 गुण
  • विज्ञान: 62 गुण
  • समाजशास्त्र:  38 गुण
  • हिंदी: 47 गुण

विशेष म्हणजे, ज्या गणितात तो नापास झाला, त्याच विषयाशी संबंधित 'अंकशास्त्र' वापरून त्याने शेकडो लोकांना गंडा घातला. पोलिसांना अद्याप त्याच्याकडे अंकशास्त्रज्ञ असल्याचे कोणतेही अधिकृत प्रमाणपत्र किंवा पदवी सापडलेली नाही.

(नक्की वाचा-  Ashok Kharat: भोंदूबाबा खरातचा नवा कारनामा! करिअर घडवण्याच्या नावाने तरुणीचं आयुष्य केलं उद्ध्वस्त )

'कॅप्टन' ही उपाधी आणि मर्चंट नेव्हीचे स्वप्न

तपास अधिकाऱ्यांच्या मते, खरातला जहाजावर अधिकारी बनण्याचे किंवा कॅप्टन होण्याचे स्वप्न असावे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी किंवा लोकांवर प्रभाव टाकण्यासाठी त्याने आपल्या नावापुढे 'कॅप्टन' ही उपाधी लावून घेतली असावी. मर्चंट नेव्हीमध्ये अधिकारी असल्याचे सांगून त्याने अनेकांना आपल्या जाळ्यात ओढले होते. मात्र आता त्याच्या शालेय गुणपत्रिकेमुळे त्याच्या पर्दाफाश झाला आहे. 
 

Topics mentioned in this article