जाहिरात

Pune News: पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ATS ची छापेमारी; पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टीशी कनेक्शन

Pune News: दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टीशी संबंधित संशयित नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी महाराष्ट्रभरात 65 आणि पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये 23 ठिकाणी मोठे छापे टाकले आहेत.

Pune News: पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ATS ची छापेमारी; पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टीशी कनेक्शन

सुरज कसबे, पुणे

Pune News: महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) राज्यभरात एक अत्यंत मोठी आणि धडक कारवाई केली आहे. पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टी याच्याशी संबंधित असलेल्या एका संशयित नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी एटीएसने मोठी मोहीम राबवली आहे. या मोहिमेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात 65 ठिकाणी, तर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात 23 ठिकाणी एकाच वेळी धडक छापे टाकण्यात आले आहेत. या कारवाईमुळे गुन्हेगारी आणि सुरक्षा वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

सोशल मीडियाचा वापर करून तरुणांना जाळ्यात ओढण्याचा संशय

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टी आणि त्याचे सहकारी फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप यांसारख्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा गैरवापर करत होते. या माध्यमांतून ते महाराष्ट्रातील आणि प्रामुख्याने पुणे-पिंपरी चिंचवड परिसरातील स्थानिक तरुणांशी संपर्क साधत होते. तरुणांवर प्रभाव पाडून त्यांना देशविघातक किंवा बेकायदेशीर कृत्यांकडे वळवण्याचा या नेटवर्कचा संशय आहे.

(नक्की वाचा-  DMart Ready: डीमार्टची 7 शहरांतील सेवा बंद; स्वस्त वस्तू देऊनही स्पर्धेतील 'ही' रणनीती ठरली वरचढ)

अनेक संशयित ताब्यात; संशयास्पद साहित्य जप्त

एटीएसने या धडक कारवाईदरम्यान अनेक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. छाप्यांच्या दरम्यान संशयितांच्या ठिकाणांवरून मोठ्या प्रमाणावर संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले आहे, ज्यामध्ये अनेक मोबाईल, फोन्स, लॅपटॉप्स, बँक खात्यांशी संबंधित महत्त्वाचे दस्तऐवज, इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांचा समावेश आहे. 

(नक्की वाचा-  KDMC News: कल्याण-डोंबिवलीकरांच्या जीवाशी खेळ! जलशुद्धीकरण केंद्रातील संतापजनक VIDEO समोर)

देशविघातक हालचालींची कसून चौकशी

ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची सध्या एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अत्यंत कसून चौकशी केली जात आहे. या नेटवर्कचा थेट संबंध पाकिस्तानमधील घटकांशी असल्याने या तपासाला राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. या कारवाईनंतर एटीएसने आपला पुढील तपास अत्यंत वेगाने सुरू केला असून, आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com