रेवती हिंगवे
राजकारणात कधी काय होईल आणि कधी कोणी काही करेल याचा नेम नाही. तसाच एक प्रकार पुण्यात घडला आहे. अलीकडच्या काळात पुण्यात अनेक गोष्टी घडत आहे. गुन्हेगारीच्या बाबतीच पुणे हे नंबर वन वर येत आहे की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. इथं शिवसेना शिंदे गटाच्या युवासेना जिल्हा प्रमुखावर गोळीबार झाला आहे. त्यात सुदैवाने काही झालं नाही पण त्यातून एक नवा अँगल समोर आला आहे. त्याची चर्चा सध्या सगळीकडे होत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
निलेश राजेंद्रे घारे हे शिवसेना युवासेनेचे जिल्हा प्रमुख आहे. ते शिवसेना शिंदे गटात कार्यरत आहेत. 19 मे रोजी रात्री 12 वाजता वारजे माळवाडी भागात घारे यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आला. वारजे पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी घारे यांच्या वाहनावर रात्री 12 वाजता गोळीबार केला होता. घारे हे आपले काम संपवून घराकडे निघाले होते. त्यावेळी ही घटना घडली.
ट्रेंडिंग बातमी - Maharashtra Rain : नागरिकांनो घरातच थांबा, मुंबईसह 'या' 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट
दरम्यान, मित्रांच्या सोबत माळवाडी येथील गणपती माथा येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात ते आले होता. बाहेर पार्किंग केलेल्या काळ्या रंगाच्या गाडीवर काही तरुणांनी गोळीबार केला. सुदैवाने यात कोणी ही जखमी झाला नव्हते. दरम्यान, वारजे पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथकं या प्रकरणाचा तपास करत आहे. घारे हे शिवसेनेच्या युवा सेना जिल्हाप्रमुख पदावर आहेत.या प्रकरणी काल उशिरा वारजे पोलिसांनी वारजे भागातून तीन जणांना ताब्यात घेतले आहे.
ट्रेंडिंग बातमी - Live Update : मुंबईसह 'या' 3 जिल्ह्यांना रेड अलर्ट
जिल्हाप्रमुख असलेल्या घारे यांनी याआधी वारजे पोलिस ठाण्यात शस्त्र परवाना मिळावा यासाठी अर्ज केला होता. मात्र तो रद्द करण्यात आला होता. शस्त्र परवाना मिळावा तसेच आपण जिल्हाध्यक्ष असल्याने पोलिस संरक्षण मिळावे यासाठी त्यांनीच हा गोळीबार घडवून आणला आहे का? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. सचिन गोळे, शुभम खेमणार आणि अजय उर्फ बगली सकपाळ असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहेत. याप्रकरणी संकेत मातले हा फरार असून वारजे पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.