Badlapur News: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला बदलापूरच्या कात्रप परिसरात एक संतापजनक घटना घडली आहे. येथील संविधान चौकातील संरचनेची तोडफोड करण्याचा प्रयत्न एका महिलेने केला. या घटनेमुळे आंबेडकर अनुयायांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात सुरक्षा वाढवली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला अचानक कात्रप येथील संविधान चौकात आली आणि तेथील स्मारकाची तोडफोड करण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहताच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने गोळा झाले आणि त्यांनी महिलेला रोखले. संतापलेल्या काही नागरिकांनी संबंधित महिलेला मारहाण केल्याचीही प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
पाहा VIDEO
(नक्की वाचा- Ashok Kharat: अशोक खरातची कोठडीत चांगलीच जिरली! लोकांसमोर यायलाही घाबरतोय, पत्नीबद्दल विचारले असता...)
प्राथमिक तपासात काय आढळलं?
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही महिला मनोरुग्ण असल्याचे सांगण्यात येत आहे. जयंतीच्याच वेळी हा प्रकार घडल्याने, यामागे कोणाचा कट आहे का? किंवा महिलेला कोणाकडून चिथावणी देण्यात आली होती का? याचा कसून तपास पोलीस करत आहेत. बदलापूरमधील या चौकातही दरवर्षी शेकडो अनुयायी अभिवादन करण्यासाठी जमतात. अशा महत्त्वाच्या दिवशी ही घटना घडल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
(नक्की वाचा- Iran-US War: जगाला दुहेही धक्का! इराणनंतर आता अमेरिकेकडूनही होर्मुजवर नाकेबंदी; युद्ध पुन्हा भडकणार?)
बदलापूर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, संबंधित महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तिला सध्या अटक करण्यात आली असून तिची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.