Badlapur News : बदलापुरकरांसाठी गुड न्यूज! लोड शेडिंगचं टेन्शन मिटलं; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

बदलापूर दिवसेंदिवस वाढतंय. गेल्या काही वर्षात बदलापूरमध्ये वास्तव्यास येणाऱ्यांची संख्या कित्येक पटीने वाढली आहे. मात्र त्यातुलनेत बदलापुरात मूलभूत सुविधांचा अभाव जाणवतो.

जाहिरात
Read Time: 2 mins

Badlapur News : बदलापूर दिवसेंदिवस वाढतंय. गेल्या काही वर्षात बदलापूरमध्ये वास्तव्यास येणाऱ्यांची संख्या कित्येक पटीने वाढली आहे. मात्र त्यातुलनेत बदलापुरात मूलभूत सुविधांचा अभाव जाणवतो. खचखच भरून जाणारी रेल्वे सेवा असो वा स्थानिक पातळीवरील अपुरी वाहतूक व्यवस्था असो वा लोड शेडिंग. बदलापुरकरांच्या अडचणी वाढतच आहेत. दरम्यान एक चांगली बातमी समोर आली आहे. बदलापुरातील लोड शेडिंगचं टेन्शन आता मिटणार आहे. बदलापूरात टाटा पॉवरचा प्लान उभारला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना विजेचा मुबलक पुरवठा होईल. 

वीज संकटाचं टेन्शन मिटलं...

बदलापूर शहराला आता टाटा पॉवरचा वीजपुरवठा होणार आहे. राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कुळगांव बदलापूर नगरपरिषद कात्रप येथील क्रीडा संकुलाच्या जागेवर चार एकरची जागा टाटा पॉवर वीज कंपनीला देण्यास आरक्षण बदलास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे बदलापूरकरांची वाढलेली विजेची मागणी टाटा पॉवर कंपनी पूर्ण करणार असून यामुळे बदलापूरकरांना पुढील काळात वीज संकटाचा कोणताही सामना करावा लागणार नाही, असं सांगितलं जात आहे.  

Advertisement

नक्की वाचा - Maharashtra Heatwave : महाराष्ट्रात उष्णतेची लाट तीव्र होणार; हे 15 जिल्हे अतिजोखमीचे, नागरिकांना इशारा

राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयाबद्दल आमदार किसन कथोरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नगर विकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बदलापूरकरांच्यावतीने आभार व्यक्त केले आहेत. टाटा पॉवरच्या स्विचिंग स्टेशनसाठी कुळगांव बदलापूर नगर परिषदेची कात्रप येथील मोहपाड्या जवळील चार एकर जागा बदलापूर नगरपालिका हस्तांतरित करण्यास मिळावी यासाठी आमदार किसन कथोरे हे गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्नशील होते. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या महत्त्वपूर्ण विषयाला मान्यता मिळाल्यानंतर सर्व प्रक्रिया पार पाडून ही जागा टाटा पॉवर कंपनीला हस्तांतरित करून या जागेवर प्रत्यक्ष काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली.