निनाद करमरकर, बदलापूर
बदलापूर गावातील ठाकूरवाडीत चक्क वासराचा बारश्याचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला. या नामकरण सोहळ्यासाठी संपूर्ण गावाला जेवण ठेवण्यात आलं होतं. आपल्या गायीवरील प्रेमापोटी गुरुनाथ कडाळी यांनी हा आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केला होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दारात रांगोळ्या, घराला फुग्यांची सजावट हा काही कुणा मुलाच्या बारशाचा कार्यक्रम नव्हता तर हा होता गायीच्या वासराचा नामकरण विधी. बदलापूर गावातील ठाकूरवाडीत वासराच्या बारशानिमित्त मटणाचं गावजेवण ठेवण्यात आलं होतं. इथले रहिवासी गुरुनाथ कडाळी यांच्या लाडक्या गौरा या गायीने सहा वर्षानंतर वासराला जन्म दिला.
(नक्की वाचा- Nashik News: कृषिमंत्री कोकाटेंना तात्पुरता दिलासा! 2 वर्षांच्या शिक्षेला स्थगिती; कोर्टाने काय म्हटलं?)
त्यामुळे कडाळी कुटुंबामध्ये आनंदाचा पारावार उरला नाही. तसच गौरा ही कडाळी कुटुंबातील नव्हे तर संपूर्ण ठाकुरवाडीतील एकमेव गाय. त्यामुळे गुरुनाथ कडाळी यांनी या गायीच्या वासराचा नामकरण विधी करायचा ठरवलं. त्या साठी ब्राह्मणाकडून मुहूर्त काढला आणि त्यानंतर वासराचा नामकरण विधी पार पडला.
((नक्की वाचा- Exclusive : 18 कोटींचं कर्ज माफ केलं 'ती' बॉलिवूड अभिनेत्री कोण? 'न्यू इंडिया' बँकेचा आणखी एक प्रताप))
वासराला ओवाळून त्याला कुंकवाचा टीका लावून त्याला हार घालण्यात आला. त्यानंतर त्याचं नाव 'छोटा बकासुर' ठेवण्यात आलं. बकासुर महाराष्ट्रात शर्यतीमध्ये नावाजलेला बैल आहे. त्याच्याच नावावरुन वासराचं नाव छोटा बकासुर ठेवण्यात आलं असं गुरुनाथ कडाळी यांनी सांगितलं.