Pune Crime News : लग्नाचं आमिष, 10 लाखांची फसवणूक; 25 वर्षीय डॉक्टर तरुणीने जीवन संपवलं

Pune Crime News : कुलदीपने आपलं लग्न झालं नसल्याचं भासवलं होतं. त्यानंतर कुलदीपने लग्नाचे आमिष दाखवून पल्लवीकडून 10 लाख रुपये घेतले.

जाहिरात
Read Time: 2 mins

रेवती हिंगवे, पुणे

मॅट्रिमोनियल साईटवरून लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक झाल्यानंतर 25 वर्षीय डॉक्टर तरुणीने आयुष्य संपवलं आहे. आर्थिक नुकसान आणि मानसिक धक्का बसल्याने तरुणीने हा टोकाचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील बिबवेवाडी पोलीस हद्दीत ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

पल्लवी पोपट फडतरे असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे. तर कुलदीप आदिनाथ सावंत असं फसवणूक करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पल्लवी आणि कुलदीप यांची भेट मॅट्रिमोनियल साईटवर झाली होती. तिथे कुलदीपने पल्लवीशे मैत्री केली. 

(नक्की वाचा-  Pune News : सावकाराच्या जाच; पत्नी आणि मुलाला संपवून पीडित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल)

कुलदीपने आपलं लग्न झालं नसल्याचं भासवलं होतं. त्यानंतर कुलदीपने लग्नाचे आमिष दाखवून पल्लवीकडून 10 लाख रुपये घेतले. त्यानंतर काही दिवसांनी त्याने आपले लग्न झाले असून पत्नी गर्भवती असल्याचे पल्लवीला सांगितले.

(नक्की वाचा - Saif Ali khan:'कुर्ता रक्ताने माखलेला, सोबत छोटा मुलगा', सैफ ज्या रिक्षात बसला त्या रिक्षाचालकानं सर्व थरार सांगितला)

पल्लवीला ही गोष्ट कळाल्यानंतर तिला मानसिक धक्का बसला. ज्याच्यासोबत लग्नाची स्वप्ने रंगवली त्यानेच आपली फसवणूक केल्याने पल्लवी तणावात होती. अखेर यातून मुक्त होण्यासाठी तिने टोकाचा निर्णय घेतला. पल्लवीने विषारी औषध घेऊन आपल्या क्लिनिकमध्ये आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांना गुन्हा दाखल केला असून सविस्तर तपास सुरु आहे. 

Advertisement

Topics mentioned in this article