जाहिरात

मुंबईतील तीन मोठ्या उमेदवारांच्या पायाला दुखापत; मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी रणनिती बदलली

Maharashtra ELection 2024 : भाजपचे उमेदवार पराग शहा हे घरातच पाय घासरून पडल्याने त्यांना डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे. मात्र निवडणुकीनंतर शस्त्रक्रिया करणार असा निर्णय त्यांनी घेतला आहे.

मुंबईतील तीन मोठ्या उमेदवारांच्या पायाला दुखापत; मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी रणनिती बदलली

विधानसभा निवडणुकांचा प्रचाराला सर्वच पक्षांनी जोमात सुरुवात केली आहे. प्रत्येक उमेदवारी उन्हातान्हाचा विचार न करता, रात्रीचा दिवस करून मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र करिअरचा टर्निंग पॉईंट ठरु शकणाऱ्या काळात काही उमेदवारांना दुखापतींमुळे फटका बसला आहे. 

प्रत्येक उमेदवार क्षणाचीही विश्रांती न घेता प्रचार करण्यामध्ये व्यस्त आहेत. असे असतानाच मनसे , भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारांना ऐनवेळी उद्भवलेल्या शारीरिक व्याधींमुळे प्रचाराची दिशा आणि पद्धत बदलावी लागली आहे. बाळा नांदगावकर स्वतः व्हील चेअरवरून प्रचार करत आहेत, तर पराग शहा कार्यालयात बसून प्रचार करताना दिसत आहेत.  

भाजपचे उमेदवार पराग शहा हे घरातच पाय घासरून पडल्याने त्यांना डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे. मात्र निवडणुकीनंतर शस्त्रक्रिया करणार असा निर्णय त्यांनी घेतला आहे. तर दुसरीकडे शिवडी येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बाळा नांदगावकर यांना देखील पायाला दुखापत झाली असून इमारतीच्या पायऱ्यांवरून उतरताना त्यांचा तोल गेला आणि त्यांना दुखापत झाली. यामध्ये त्यांच्या तळपायाला दुखापत झाली आहे. 

तर मानखुर्दचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार नवाब मलिक यांना देखील गुडघेदुखीचा त्रास होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे या तिन्ही उमेदवारांना प्रचार करण्यात अडचणी येत असल्या तरी देखील प्रचारात कुठेही खंड पडणार नाही, याची काळजी सगळेच नेते आणि उमेदवार घेताना पाहिला मिळत आहे. 

सध्या बाळा नांदगावकर व्हील चेअरवरून प्रचार करताना दिसत आहेत. तर घाटकोपर पूर्व चे भाजपचे उमेदवार पराग शहा कार्यालयात बसून प्रचाराची आखणी करत आहेत. त्यांचे कार्यकर्ते शहा यांनी आखणी करून दिल्यानुसर प्रचार करत आहेत. तर नवाब मलिक यांना देखील गुडघेदुखीचा त्रास होत असून कार्यकर्त्यांना घेऊन ते प्रचार करताना दिसत आहेत. त्यांना या मेहनतीचं फळ मिळणार का हे येत्या 23 नोव्हेंबर रोजी स्पष्ट होईल. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com