Inspirational Story: 'या' बसस्थानकाने महाराष्ट्रात पटकावला प्रथम क्रमांक, 1 कोटींचं बक्षिसही जिंकलं

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक अभियानात बारामती बसस्थानकाने 'अ'वर्गामध्ये 97 गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावून 1 कोटी रुपयांचे पारितोषिक पटकावले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Baramati Bus Stand 1st In Maharashtra

देवा राखुंडे, प्रतिनिधी

Maharashtra Clean And Beuatiful Bus Stand :  हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक अभियानात बारामती बसस्थानकाने 'अ'वर्गामध्ये 97 गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावून 1 कोटी रुपयांचे पारितोषिक पटकावले आहे.राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आगारातील चालक,वाहक,यांत्रिक,प्रशासकीय व पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन केलं आहे.

राज्य परिवहन महामंडळात प्रवाशांना स्वच्छ,सुंदर बसस्थानके उपलब्ध व्हावीत व प्रवाशांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होण्याच्या हेतूने या अभियानाची 23 जानेवारी ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत महामंडळातील सर्व बसस्थानकावर अभियान राबविण्यात येत आहे.हे अभियान स्पर्धात्मक असून उत्कृष्ट बसस्थनाकांना रोख रक्कम देवून गौरविण्यात येते.बसस्थानकाच्या कामगिरीवर आधारित सर्वेक्षण करण्यात आले असून त्यामध्ये बारामती बसस्थानकाला प्रथक क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. 

Advertisement

नक्की वाचा >> Sindhudurg News : देवगडमध्ये 'त्या' घराजवळ सुरु होता हादरंवून टाकणारा प्रकार, 5 फूट उंचीची 23 झाडे केली जप्त

त्येक स्तरावरील समितीने दिलेला निर्णय अंतिम

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानाअंतर्गत प्रत्येक स्तरावरील तपासणी समित्यांनी त्यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रातील बसस्थानकाची तपासणी कधी व किती कालावधीत केली,याची नोंद बसस्थानकाच्या स्वच्छता अभियान नोंदवहीत करण्यात येते.तपासणी समितीच्या प्रत्येक सदस्याने काटेकोर तपासणी करुन मूल्यांकन निःपक्षपातीपणे करण्याच्या सूचना दिल्या जातात.प्रत्येक स्तरावरील समितीने दिलेला निर्णय हा अंतिम असतो.  

नक्की वाचा >> IPL 2026 मध्ये वैभव सूर्यवंशीचा प्रवास संपला! आता 'बेबी बॉस' कधी आणि केव्हा खेळणार सामने? वाचा संपूर्ण शेड्युल

बसस्थानकाला प्रथम क्रमांक कोणत्या आधारावर दिला जातो?

प्रत्येक स्तरावरील तपासणी समितीने त्यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रामध्ये तपासणीअंती गुणपत्रिका तयार करुन त्यावर सदस्यांची स्वाक्षरी केली जाते.जर दोन किंवा त्यापेक्षा जास्त बसस्थानकांना समसमान गुण प्राप्त झाले तर अशा वेळी ज्या बसस्थानकावरील बस फेऱ्यांची संख्या जास्त असेल त्या बसस्थानकाला वरचा क्रमांक देण्यात येतो.नव्या स्वच्छता अभियानामध्ये मागील स्वच्छता अभियानामध्ये केलेल्या कामगिरीची योग्य दखल घेतली घेण्यात येते.परंतु,नव्या संकल्पना किंवा इतर नावीन्यपूर्ण योजना (ज्या पूर्वी वापरलेल्या नाहीत)या अभियानामध्ये अपेक्षित असल्यामुळे त्या संकल्पना व नावीन्यपूर्ण योजनांचा गुण क्रमांक देण्यासाठी विचार करण्यात येतो.