When is Vaibhav Sooryavanshi playing next: आयपीएल 2026 मध्ये वैभव सूर्यवंशीचा प्रवास संपला आहे.या सीजनच्या आयपीएलमध्ये वैभवने 16 सामन्यांमध्ये 776 धावा केल्या. वैभव सूर्यवंशीने 237.31 च्या स्ट्राईक रेटने धावांचा पाऊस पाडला.आयपीएल 2026 मध्ये वैभवने 63 चौकार आणि 72 षटकार ठोकले. आयपीएलमध्ये 2026 मध्ये वैभव सूर्यवंशीचा प्रवास संपल्यानंतर आता क्रिडाविश्वात एक प्रश्न उपस्थित झाला आहे. आता 15 वर्षांचा वैभव केव्हा आणि कधी क्रिकेटचा सामना खेळणार? या खेळाडूचा जलवा कधी पाहायला मिळणार? असे प्रश्न चाहत्यांकडून सोशल मीडियावर उपस्थित केले जात आहेत.
जूनमध्ये रंगणार सामने
आता वैभव सूर्यवंशी पुढच्या महिन्यात म्हणजेच जूनमध्ये श्रीलंकेविरोधात सीरिज खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. वैभव श्रीलंकेत होणाऱ्या टॉई सीरिजचा भाग राहणार आहे. 50-50 ओव्हर्सच्या फॉर्मेटमध्ये होणाऱ्या सीरिजमध्ये वैभव श्रीलंका ए आणि अफगानिस्तान ए टीमविरोधात मैदानात उतरणार आहे.
वैभव सूर्यवंशीचा पुढचा सामना कधी आणि कोणत्या संघाविरोधात?
09 जून: भारत-अ विरुद्ध श्रीलंका-अ
11 जून: भारत-अ विरुद्ध अफगानिस्तान-अ
15 जून: भारत-अ विरुद्ध श्रीलंका-अ
17 जून: भारत-अ विरुद्ध अफगानिस्तान-अ
21-जून: फायनल
किती वाजता आणि कुठे होणार सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट
सर्व सामने भारतीय वेळेनुसार सकाळी 11 पासून खेळवण्यात येतील.आगामी वनडे ट्राय-सीरिजच्या सामन्यांचं लाईव्ह स्ट्रिमिंग Sony LIV अॅपवर होईल. तर लाईव्ह स्ट्रीम Sony Sports Network वर करण्याची शक्यता आहे.याशिवाय, या सामन्यांचा श्रीलंका क्रिकेट (SLC) च्या अधिकृत सोशल मिडिया चॅनेल्सवरही थेट लाईव्ह प्रसारण करण्याची शक्यता आहे. याशिवाय फॅनकोडवरही सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग केलं जाऊ शकतं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world