Pune News: वकील महिला, पोलिस हवालदार अन् प्रेमसंबंध! प्रेमाच्या खेळात, 2 वर्षाचा संसार अशा वळणावर पोहचला की..

तसेच फिर्यादीशी अपमानास्पद व अश्लील भाषेत संवाद साधत तिला वारंवार मानसिक त्रास दिल्याचा आरोप आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
पुणे:

देवा राखुंडे 

वकील असलेल्या महिलेला एका पोलिस हवालदाराने आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर लॉजवर नेवून लैंगिक शोषण केलं. येवढचं काय तर एका मंदिरात जावून खोटं-खोटं लग्न ही केलं.  पुढे ती गर्भवती ही राहीलं आणि तिथूनच सर्व काही फिसकटलं. आपण फसवलो गेलो आहे हे वकील महिलेच्या लक्षात आले. त्यावेळी तिच्या पायाखालची वाळू सरकली. ही घटना बारामतीत घडली आहे. रमेश मोहन जाधव असं या पोलीस हवालदाराचं नाव आहे. त्यानेलग्नाचे खोटे आश्वासन देत तिचा विश्वास संपादन केला होता. त्यानंतर तिचा दीर्घकाळ सहजीवन ठेवून लैंगिक शोषण ही  केले. त्यातून ती गर्भवती ही राहीली होती. 

पोलीस हवालदार रमेश मोहन जाधव हा पुण्यातील खडकी पोलीस ठाण्यामध्ये नियुक्तीच आहे. तो मूळचा करमाळा तालुक्यातील निंभोरे येथील रहिवासी आहे. तो सध्या सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथे राहतो. पीडित महिला व्यवसायाने वकील आहे. 2024 मध्ये न्यायालयीन कामकाजाच्या निमित्ताने आरोपीचा तिच्याशी संपर्क आला होता. सुरुवातीला न्यायालयीन प्रकरणाच्या कारणाने संवाद सुरू झाला. पुढे आरोपीने सातत्याने मोबाईलवर संपर्क ठेवत, फोन, संदेश व वैयक्तिक संवादाच्या माध्यमातून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर स्वतःचे पहिले वैवाहिक जीवन संपुष्टात आले आहे. पत्नीपासून अनेक वर्षे विभक्त राहत असल्याचे तिला त्याने सांगितले. शिवाय कायदेशीर विवाह करणार असल्याचे तिला वारंवार आश्वासन दिले. 

Advertisement

नक्की वाचा - Ambernath News: 12 व्या मजल्यावरून ढकललं, परस्पर दफन करण्याचा ही प्रयत्न, पण तिसऱ्या डोळ्यामुळे गेम खल्लास

तूच माझी होणारी पत्नी आहेस, आयुष्यभर तुझी साथ सोडणार नाही, आपण कायदेशीर विवाह करू अशी भावनिक आश्वासने त्याने तिला दिली. त्यानंतर 28 डिसेंबर 2024 रोजी आरोपी बारामती येथे आला. आर्थिक अडचण असल्याचे कारण सांगून त्याने तिच्याकडून चाळीस हजार रुपये घेतले. त्याच दिवशी आरोपीने फिर्यादीला बारामती येथील एका लॉजमध्ये नेले. तेथे पुन्हा विवाहाचे आश्वासन देऊन तिची फसवणूक करत प्रथमच शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप महिलेने केला आहे. या घटनेनंतर आरोपीने आपल्या नातेवाईकांसह तिच्या घरी जाऊन विवाहाबाबत चर्चा केली. त्यामुळे आरोपीचे आश्वासन खरे असल्याचा तिला विश्वास पटला. काही दिवसांनी आरोपीने एका मंदिरात स्वतःच्या गळ्यातील साखळी मंगळसूत्र म्हणून घातली. आता तू माझी कायदेशीर पत्नी आहेस असे सांगितले.

नक्की वाचा - Success Story : 9 महिने नोकरी नाही, मग तरुणाने CV मध्ये बदलल्या 4 गोष्टी; थेट 50 लाख पॅकेजचा मिळाला जॉब 

ते दोघे एकत्र राहू लागले. त्यादरम्यान ती गर्भवती राहिली. गर्भधारणेनंतर आरोपीचे वर्तन बदलले. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार आरोपीने तिची कोणतीही शारीरिक, मानसिक अथवा आर्थिक जबाबदारी स्वीकारली नाही. उलट संशय घेऊन वाद घालणे, मानसिक त्रास देणे, आवश्यक उपचारासाठी मदत न करणे तसेच गर्भधारणेदरम्यान तिला एकटीला सोडून देणे अशा प्रकारे वागणूक दिली. पुढे तिला मुलगी झाली. मुलगी आरोपीपासून झालेली असून तोच तिचा जैविक पिता असल्याचा दावा फिर्यादीने केला आहे. मात्र मुलीच्या जन्मानंतरही आरोपीने मुलीला स्वीकारण्यास नकार दिला. तिची भेट घेतली नाही, संगोपनासाठी कोणतीही आर्थिक मदत केली नाही. तसेच फिर्यादीशी अपमानास्पद व अश्लील भाषेत संवाद साधत तिला वारंवार मानसिक त्रास दिल्याचा आरोप आहे.

नक्की वाचा - Neet Love Story: आंदोलनासाठी गेले लग्न करून परत आले! जंतर-मंतरवरची 'नीट' प्रेम कहाणी, Video होतोय व्हायरल

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार आरोपीने विविध वेळा तिच्याकडून तसेच तिच्या नातेवाईकांकडून रोख व ऑनलाईन स्वरूपात आर्थिक व्यवहार केले. त्यातील मोठा हिस्सा अद्याप परत करण्यात आलेला नसून आर्थिक फसवणूक केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.याशिवाय आरोपीने वेळोवेळी "तक्रार मागे घे", "तडजोड करू", "गुन्हा दाखल करू नकोस" अशा प्रकारे दबाव टाकला. तसेच अश्लील व अपमानास्पद भाषा वापरत धमक्या दिल्याचाही फिर्यादीचा आरोप आहे. सर्व तांत्रिक, डिजिटल, वैज्ञानिक व दस्तऐवजीय पुराव्यांच्या आधारे निष्पक्ष व सखोल तपास करण्यात येत आहे. या प्रकरणाबाबत कोणाकडेही उपयुक्त माहिती किंवा पुरावे असल्यास त्यांनी बारामती शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधून तपासात सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement