सार्वजनिक गणेशोत्सवात गणपती बाप्पाचं दर्शन घेता यावं यासाठी मुंबईत रात्रभर बस सेवा उपलब्ध असणार आहे. नऊ मार्गांवर 24 अतिरिक्त बसगाड्या चालविण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
7 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर यादरम्यान बस सुरू असतील. गेल्यावर्षी बेस्टने गणेशोत्सव काळात पाच दिवस बस सेवा दिली होती. यंदा यात वाढ करण्यात आली आहे. यंदा राज्य सरकारच्या सूचनेनुसार, दहा दिवस बस सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वसाधारणपणे गणेशोत्सव काळात मुंबईत रात्रीतून सार्वजनिक गणपती मंडळांचं दर्शन घेण्यासाठी भाविक घराबाहेर पडतात. रात्रभरत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचं दर्शन घेतल्यानंतर ते सकाळी घरी परतत असतात. अशावेळी भाविकांना अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी बेस्टने संपूर्ण गणेशोत्सव काळात बेस्ट सेवा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे.
नक्की वाचा - SIT पथक बदलापुरात पोहोचले, शाळेनंतर आरोपीच्या घराचाही करणार तपास
7 सप्टेंबर ते 16 सप्टेंबरपर्यंत रात्री 10.30 ते पहाटे सहा वाजेपर्यंत नऊ मार्गांवर 24 बस गणेशभक्तांच्या सेवेत असतील.
कोणत्या मार्गांवर मिळणार बेस्ट सुविधा...
4 लि. - डॉ. एम. इक्बाल चौक ते ओशिवरा आगार
8 लि. - जिजामाता उद्यान ते शिवाजी नगर टर्मिनस
ए-21 - एस.पी.एम. चौक ते देवनार आगार
ए-25 - बँकवे आगार ते राणी लक्ष्मीबाई चौक (सायन)
ए-42 - पं. पळुस्कर चौक (ऑपेरा हाऊस) ते सँन्डहर्स्ट रोड स्थानक
44 - वरळी गाव ते एस. यशवंतराव चौक (काळाचौकी)
51 - इलेक्ट्रिक हाऊस ते सांताक्रुझ आगार
69 - डॉ. एस.री.एम. चौक (म्युझियम) ते पी.टी. उद्यान, शिवडी
66 - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते राणी लक्ष्मीबाई चौक (शीव)