जाहिरात

SIT पथक बदलापुरात पोहोचले, शाळेनंतर आरोपीच्या घराचाही करणार तपास

बदलापुरातील प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी आरती सिंह (IPS Arti Singh) यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश दिले होते.

SIT पथक बदलापुरात पोहोचले, शाळेनंतर आरोपीच्या घराचाही करणार तपास
फोटो -प्रातिनिधीक
बदलापूर:

निनाद करमरकर

बदलापुरातील (Badlapur School Case) भयंकर घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचा भडका उडाला आहे. या उद्रेकानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सदर प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी आरती सिंह (IPS Arti Singh) यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश दिले होते. या पथकाने कामाला सुरुवात केली असून या पथकाने आज बदलापुरातील त्या शाळेला आणि आरोपीच्या घराची पाहणी केली.  

हे ही वाचा : आंदोलकांच्या सुटकेसाठी गेलेल्या वकिलांसोबत पोलिसांची अरेरावी?

नराधमाने तीनदा केले लग्न, तीनही बायका सोडून गेल्या

बदलापुरातील चिमुकल्यांवर अत्याचार प्रकरणात पोलीस तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. आरोपी अक्षय शिंदेबाबत देखील एक चक्रावणारी माहिती समोर आली आहे. अवघ्या 24 वर्षांच्या अक्षयने तीन लग्न केली असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे त्याच्या तिन्ही बायका त्याला सोडून निघून गेल्या आहेत.  मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर पूर्वेतील खरवई गावात राहणाऱ्या आरोपी अक्षय शिंदेचे वय केवळ 24 वर्षे आहे. मात्र त्याचे आधीच तीन लग्न झाले होते. मात्र त्याच्या तिन्ही बायका त्याला सोडून गेल्या आहेत. बदलापूरमधील एका नामवंत शाळेत तो सफाई कर्मचारी म्हणून काम करत होता. याआधी एका इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. 

हे ही वाचा : 3 वर्षाच्या चिमुरडीचा मृतदेह 15 दिवसापूर्वी जंगलात पुरला, अंगावर काटा आणणारी घटना

'ती' अजूनही धक्क्यात, लघवीला जायला घाबरते, शाळेतही जाण्यास नकार!

अक्षय कर्नाटकातील गुलबर्गा गावातील असून त्याचा जन्म मात्र बदलापूरमधील खरवई गावात झाला. तो खरवई गावातील एका चाळीत आपल्या आई-वडील, भाऊ आणि भावाच्या पत्नीसोबत राहत होता. मात्र गावकऱ्यांनी त्याच्या घरावर हल्ला करून तोडफोड केली आहे. अक्षयचे नातेवाईक देखील शेजारीच राहत होते, त्यांच्याही घराची तोडफोड गावकऱ्यांनी केली. या घटनेनंतर अक्षय आणि त्याचे कुटुंब खरवई गावातून गायब झाले आहेत. गावातील महिलांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, अक्षयचे तीन वेळा लग्न झाले होते, परंतु कोणतीही पत्नी सध्या त्याच्यासोबत राहत नाही.अक्षय याला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  सोमवारी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाईल. 

हे ही वाचा: पोटावर, पाठीवर, तोंडावर चटके.. 3 वर्षांच्या चिमुकलीचा छळ; भिवंडीतील आश्रम संचालकाला अटक

बदलापुरातील शाळेत दोन चिमुरडींचं लैंगिक शोषण करण्यात आलं. या घटनेनं केवळ महाराष्ट्रालाच नाही तर देशाला धक्का बसला आहे. ही घटना 13 ऑगस्टला घडली होती, मात्र याचा उलगडा तीन दिवसांनी झाला. मुलीच्या कुटुंबीयांनाही याची माहिती नव्हती. मात्र मुलीच्या वागणुकीत बदल झाल्याने त्यांना संशय आला आणि त्यांनी तिच्या वर्गातील दुसऱ्या मुलीच्या पालकांशी संपर्क साधला आणि धक्कादायक बाब उघड झाली. या घटनेनंतर ती लघवी रोखून ठेवत होती. तिला लघवीला जायला भीती वाटत होती. तिला नीट चालताही येत नव्हतं. तोपर्यंत तरी पीडितेला संसर्ग झाल्याचं तिच्या कुटुंबीयांना वाटत होतं. मात्र वैद्यकीय तपासात चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आलं आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. 

शाळा व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष...
पीडितेच्या कुटुंबीयांनी या प्रकरणात शाळा व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला आहे. काही दिवसांपूर्वी शाळेतील काहीजणींनी आरोपीविरोधात शाळेच्या शिक्षकांकडे तक्रार केली होती. मात्र शाळेकडून यावर काहीच कारवाई करण्यात आली नाही. वेळीच याची दखल घेतली असती तर हा अनर्थ टाळता आला असता असं पीडितेच्या पालकांचं म्हणणं आहे. याशिवाय आरोपीविरोधात एफआयआर नोंदवण्यात बारा तास उशीर करण्यात आला. यानंतरही वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात गेले असता दिरंगाई केल्याचा पीडितेच्या पालकांचा आरोप आहे.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
कंडोम शिवाय संबंध ठेवण्याची नवऱ्यावर जबरदस्ती, वैद्यकीय चाचणीचा अहवाल वाचून नवरा हादरला
SIT पथक बदलापुरात पोहोचले, शाळेनंतर आरोपीच्या घराचाही करणार तपास
man from Uttar Pradesh sold his 2-year-old son to save his wife and newborn baby
Next Article
गरिबीचा सौदा! बायको अन् नवजात बाळाला सोडवण्यासाठी त्यानं 2 वर्षांचा मुलाला विकलं