World Richest Beggar: जगातील श्रीमंत लोकांच्या अनेक गोष्टीबाबत ऐकायला मिळतं. पण काही स्टोरी इतक्या अनोख्या असतात की त्यांच्यावर विश्वास ठेवणं कठीण बनतं. मुंबईचे भरत जैन यांची स्टोरीही अशीच आहे. जिथे एका भिकाऱ्याने भीख मागून कोट्यावधींची संपत्ती जमा केली आहे. तो आता जगातील सर्वात श्रीमंत भिकारी म्हणून ओळखला जात आहे.
भरत जैन कोण आहे?
मुंबईत राहणाऱ्या भरत जैनचं बालपण खूप गरिबीत गेलं. त्यांच्याकडे शिक्षण घेण्यासाठी आणि नोकरीसाठी कोणतेही योग्य मार्ग नव्हते. परिस्थितीमुळे त्यांनी लहानपणापासूनच भीख मागणं सुरू केलं. मागील जवळपास 40 वर्षांपासून ते मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)आणि आझाद मैदान सारख्या परिसरात रोज 10-12 तास भीख मागत असतात.
कमाई आणि संपत्ती
रिपोर्ट्सनुसार, भरत जैन यांची दररोजची कमाई जवळपास 2000 ते 2500 रुपये आहे. अशाप्रकारे महिन्याला त्यांची कमाई जवळपास 60000 ते 75000 रुपयांपर्यंत होते. त्यांनी है पैसे खर्च न करता रिअल इस्टेटमध्ये गुंतवले. आज त्यांच्याकडे मुंबईत 1.4 कोटी रुपयांचे दोन फ्लॅट आहेत. ठाण्यात दोन दुकाने आहेत. प्रत्येक महिन्याला जवळपास 30000 रुपये भाडा मिळतो. त्यांचं एकूण नेटवर्थ जवळपास 7.5 कोटी रूपये असल्याचं सांगितलं जातंय.
नक्की वाचा >> Navi Mumbai : नवी मुंबईत सिडकोच्या माजी अधिकाऱ्याविरोधात मोठी कारवाई, राहत्या घरी ACB चं पथक पोहोचलं अन्..
कुटुंब आणि लाईफस्टाईल
भरत जैनचं कुटुंब चांगली लाईफस्टाईल जगत आहेत. त्यांच्या कुटुंबात पत्नी,दोन मुले, वडील आणि भावाचा समावेश आहे. त्यांच्या मुलांनी चांगल्या शाळेतून शिक्षण घेतलं आहे. आता ते कुटुंबाचं स्टेशनरी बिझिनेस सांभाळत आहेत.
तरीही भीख का मागतात?
सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, एवढी संपत्ती असूनही भरत जैन आजही भीख मागतात. काही लोक त्यांना लोभी म्हणतात. तर काही लोक म्हणतात की,हा त्यांच्या जीवनशैलीचा भाग बनला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world