जाहिरात

Bhiwandi Wada road: रस्ता कसा नसावा याचा उत्तम नमुना म्हणजे "भिवंडी-वाडा -मनोर महामार्ग"

भिवंडी - वाडा - मनोर महामार्गावर सुरुवातीला 2010 ते 2013 या काळात सुप्रीम इन्फ्रा प्रा. लि. कंपनीने हा रस्ता बनवला.

Bhiwandi Wada road: रस्ता कसा नसावा याचा उत्तम नमुना म्हणजे "भिवंडी-वाडा -मनोर महामार्ग"
भिवंडी:

मनोज सातवी

कोट्यवधी रुपये खर्च करून देखील भिवंडी वाडा मनोर या महामार्गाची दयनीय अवस्था आहे. वाड्यापासून भिवंडी हे 40 किलोमीटरचे अंतर पार करायला चार ते पाच तास लागतात. शासनाने 8 वर्षात दुरुस्ती आणि काँक्रीटच्या पॅच साठी 170 कोटी रुपये खर्च केले. मात्र सर्व खड्ड्यात गेल्याची परिस्थिती आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी या 64 किलोमीटर रस्त्याच्या निर्माणासाठी शासनाने पुन्हा 801 कोटी रुपयांचे कंत्राट इगल इन्फ्रा या कंपनीला दिले आहे. पण झालं काहीच नाही.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शिवाय केवळ कॅन्सल्टन्सीसाठी तब्बल 3 कोटी रुपये खर्च केला. मात्र वर्षभरापासून केवळ मलम पट्टीचे काम होत असल्याने जीव मुठीत घेऊन चालणाऱ्या प्रवाशांमध्ये आणि सामान्य नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. डिसेंबर 2023 मधे नागपूर येथील हिवाळी अधिवेशानात हा मुद्धा गाजला होता. त्यावेळी संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचे देखील सरकार तर्फे सांगण्यात आले होते. मात्र यावर कोणतीच कारवाई झाली नाही. या रात्याचे गौडबंगाल काय आहे? याची चर्चा सध्या सुरू आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Shocking news: प्रेयसीचा साखरपुडा, प्रियकराची शेवटची इच्छा, हॉटेलमध्ये भेटले, रात्रभर राहीले, सकाळी मात्र...

भिवंडी - वाडा - मनोर महामार्गावर सुरुवातीला 2010  ते 2013 या काळात सुप्रीम इन्फ्रा प्रा. लि. कंपनीने हा रस्ता बनवला. त्यासाठी 392 कोटी रुपये खर्च केले. हा रस्ता बीओटी तत्त्वावर तयार करण्यात आला. 64 किलोमीटर डांबरी रस्ता  बनवला गेला. परंतु काही ठिकाणी रस्त्याचे काम अपूर्ण आणि नादुरुस्तेत होते. त्यामुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले. त्याममुळे आंदोलने ही झाली. जनतेच्या आक्रोशानंतर  या महामार्गवरील टोल नाका 2017 साली  कायमचा बंद करण्यात आला. त्यानंतर या रस्त्याची देखभाल दुरूस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आली. 

ट्रेंडिंग बातमी - Pune News: पुण्यातील 'ही' पर्यटन स्थळं पुढील 3 महिने राहणार बंद

  • 2017 ते 2020  साली केलेला खर्च : 20 कोटी 49 लाख.
  • 2020 ते 2022 साली केलेला खर्च : 69 कोटी 90 लाख.
  • 2022 ते 2025 साली केलेला खर्च : 80 कोटी.

पूर्ण नवीन सिमेंट काँक्रिट रस्त्यासाठी मागच्या वर्षी 801 कोटी रुपये चे टेंडर ईगल इन्फ्रा कंपनीला देण्यात आले आहे. आता सुरू असलेले 80 कोटींचे काम करणारे आणि आधी दुरुस्तीसाठी ठेके घेणारे मोठे ठेकेदार.कंत्राटदार आणि राजकीय पक्ष पुढील प्रमाणे.

जिजाऊ कन्स्ट्रक्शन  (निलेश सांबरे शिवसेना उपनेते) 
मयूर कन्स्ट्रक्शन (बाळकृष्ण ठाकरे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष) 

जय भारत कन्स्ट्रक्शन 
विशेष म्हणजे जव्हार सा. बा. विभागाने या भिवंडी वाडा मनोर महामार्गासाठी रस्त्याच्या तांत्रिक सल्लागार म्हणून तब्बल 3 कोटी रुपयांचा निधी खर्च केला आहे.

  • टेक्नोलीगल कन्सल्टंट, ठाणे 25 लाख रुपये.
  • टेक्नोझोन कन्सल्टंट, मुंबई 2 कोटी 25 लाख रुपये.
  • कदम असोसिएट्स, मुंबई - 50 लाख रुपये.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com