देवा राखुंडे, प्रतिनिधी
Pune Daund Robbery CCTV Video : दौंड शहरातील अहिल्यानगर मार्गावरील लोखंडे वस्ती परिसरात मध्यरात्री दुहेरी दरोड्याची घटना घडली आहे. दरोडेखोरांनी सुमारे एक लाख रुपये रोख रक्कम पाच तोळे सोन्याच्या दागिन्यांसह चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू लंपास केल्या आहेत. अशी माहिती समोर आली असून हे दरोडेखोर एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत. हिरालाल शाहूराव शिंदे यांच्या बंद बंगल्यावर पहिला दरोडा टाकला.पाच जणांच्या टोळीने मध्यरात्री दरवाजे तोडून घरात प्रवेश केला. चोरीस गेलेल्या मुद्देमालाचा तपशील अद्याप स्पष्ट झालेला नसून घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
यानंतर काही अंतरावर असलेल्या दत्तात्रय सपकाळ यांच्या शेतातील बंगल्यावर देखील या अज्ञात चोरट्याने दरोडा टाकला.दरोडेखोरांनी सुमारे एक लाख रुपये रोख रक्कम पाच तोळे सोन्याचे दागिने यासह चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू लंपास केल्याची माहिती मिळाली आहे. दौंड पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत. दरम्यान, या अज्ञात दरोडेखोरांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. दौंड सारख्या गजबजलेल्या शहरात ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीच वातावरण आहे. मात्र या दरोडेखोरांना जेरबंद करण्यासाठी पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे.
नक्की वाचा >> Railway Mega Block Latest Update: 'या' तारखेचा हार्बर मार्गावरील मेगा ब्लॉक रद्द! कारण वाचून खुश व्हाल
त्या ठिकाणी नेमकं काय घडलं?
दौंड-अहिल्यानगर - मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील दौंड तालुक्यातील सोनवडी गावातील लोखंडे वस्तीवर पहाटेच्या सुमारास हा दरोडा पडला.दत्तात्रय सपकाळ यांच्या बंगल्यावर या अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकला.दरोडेखोरांनी ओढ्याजवळ असलेल्या बंगल्याच्या बाजूचे लाकडी दार उचलले.घरात प्रवेश केला आणि खोलीमधील लाकडी कपाटाचे ड्रॉवर व लॉकरचे कुलूप तोडण्यात आले. कपाटातील किमान पाच तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व एक लाख रूपयांची रोकड या दरोडेखोरांनी लंपास केली.याशिवाय सपकाळ यांची कांद्याची व कपाशीची पट्टी असलेली रोकडच चोरीला गेली आहे. बंगल्याच्या मागील बाजूच्या संरक्षक जाळ्याच्या लोखंडी तारा तोडून दरोडेखोरांनी गोदामात देखील उचकापाचक केल्याची माहिती समोर येत आहे.
नक्की वाचा >> बॉलिवूडच्या फेमस अभिनेत्रीच्या पित्यानं स्वत:च्याच बहिणीशी केलं होतं लग्न! माधुरी दीक्षितवरही होता क्रश
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world