बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Elections) रिंगणात उतरलेले भोजपुरीचे सुपरस्टार खेसारी लाल यादव यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. खेसारी यादव हे राष्ट्रीय जनता दलाकडून (RJD) छपरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. खेसारी सध्या प्रचारात व्यस्त आहेत. अशा वेळीत त्यांना मीरा भाईंदर महापालिकेने एक नोटीस पाठवली आहे. मीरा रोड (Mira Road) येथील त्यांच्या बंगल्यात अवैध बांधकाम (Illegal Construction) केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे.
मीरा भाईंदर महापालिकेने (MBMC) खेसारी लाल यादव यांना ही नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये मीरा रोड येथील जुन्या पेट्रोल पंपजवळ असलेल्या त्यांच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामा बाबत आहे. ते तोडण्याची सूचना या नोटीसमध्ये दिली आहे. 3 नोव्हेंबर (November 3) रोजी जारी केलेल्या या नोटीसमध्ये, शत्रुघ्न कुमार यादव उर्फ खेसारी लाल यादव यांच्या बंगल्यात बांधकामाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे नमूद आहे. पुढील 1 ते 2 दिवसांत या अवैध बांधकामावर कारवाई होण्याची शक्यता आहे, असं म्हटलं आहे.
खेसारी लाल यादव यांच्या छपरा मतदारसंघात 6 नोव्हेंबर (November 6) रोजी पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. या निवडणुकीत त्यांची लढत छोटी सिंह यांच्याशी आहे. ऐन मतदानाच्या तोंडावर ही नोटीस आल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी ही खेसारी यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याची एक पद्धत असल्याचे म्हटले आहे. या कारवाईचा निवडणुकीतील (Election) कामगिरीवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world