मनोज सातवी, प्रतिनिधी
Pratap Sarnaik Latest News : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती,महाविकास आघाडी आणि इतर पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मीरा-भाईंदरमध्ये शिवसेना-भाजप महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. महायुती तुटण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. अशातच शिवसेनेचे नेते व मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजपला थेट इशारा दिला आहे."उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना पुढील 24 तासांत ठोस चर्चा झाली नाही,तर शिवसेना स्वतंत्र निर्णय घेईल",असं सरनाईकांनी म्हटलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांतील मतभेद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपने युतीबाबत उदासीन भूमिका घेतल्यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या 95 सदस्यीय पालिकेत भाजपकडे 61 नगरसेवक आहेत. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 8 जागा देण्यात आल्या आहेत. तर शिवसेनेच्या 22 जागा असतानाही त्यांना फक्त 13 जागा देण्याचा प्रस्ताव आमदार नरेंद्र मेहता मांडला होता, त्यामुळे हा राजकीय वाद अधिक चिघळला आहे.
नक्की वाचा >> खोपोलीच्या मंगेश काळोखे हत्या प्रकरणात रायगड पोलिसांची सर्वात मोठी कारवाई, कोणा कोणाला केली अटक?
प्रताप सरनाईकांनी का व्यक्त केली नाराजी?
युतीबाबतचा निर्णयासाठी स्थापन करण्यात आलेल्या समन्वय समितीची पहिलीच बैठक निष्फळ ठरली. त्यानंतर प्रताप सरनाईक म्हणाले की,"नरेंद्र मेहता यांनी फोन उचलला नाही. ते बैठकीला 50 मिनिटे उशिरा पोहोचले.यामुळे शिवसेनेत तीव्र नाराजी पसरली आहे. युतीबाबत ठोस हालचाल न झाल्यास रविवारी पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिका जाहीर करू, असा इशाराही सरनाईक यांनी दिला आहे. “मी अजूनही मेहता यांच्या फोनची वाट पाहतोय;मात्र वेळ निघून जात आहे,”असंही ते म्हणाले.
नक्की वाचा >> Mumbai News: 'दूध पिताय की पांढरं विष?', मुंबईच्या 'या' भागात धक्कादायक प्रकार, व्हायरल व्हिडीओनं चिंता वाढवली
शिवार उद्यानाचा ठेका 2004 मध्ये मंजूर झाला, पण..
युतीसाठी भाजपकडून शिवार उद्यानाचा ठेका रद्द करणे आणि शिवसेनेत आयात झालेले भाजप कार्यकर्ते परत करणे अशा अटी मांडण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.यावर उत्तर देताना सरनाईक म्हणाले,शिवार उद्यानाचा ठेका 2004 मध्ये भाजप नगरसेवकांच्या सह्यांनीच मंजूर झाला होता.तुमचे चार नगरसेवक आम्हाला परत द्या,मग आम्हीही तुमचे कार्यकर्ते परत करू,असंही ते म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world