सध्या देशात अनेक योजनांचा पाऊस सुरु आहे. त्यामुळे मतदारांची मते आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी प्रत्येक पक्ष हा धडपड करत आहे. मग ते कुठल्या ना कुठल्या योजनेच्या माध्यमातून असो की तात्पुरता स्वरूपात दिलेली आश्वासने असो, सर्वजण मतदारांचे मत मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करत असल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे. पण काही जण असे असतात की जे खऱ्या अर्थाने सामाजिक कार्य करत असतात. त्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. अशा पैकीच एक आहे अभिषेखानंद वेशू हा तरूण. त्याने हाती घेतलेले काम हे खरोखरच कौतूक करण्या सारखे आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अभिषेखानंद वेशू हा बिहारच्या पाटणा इथं राहाणारा तरूण आहे. त्याने एक काम हाती घेतले आहे. त्याने पाटणा ते मुंबई अशी 'चुप्पी तोडो' यात्रा हाती घेतली आहे. या यात्रे मागचं त्याचे उद्दीष्ठ मोठे आहे. महिलांना मोफत सॅनिटरी पॅड मिळावेत यासाठी ही यात्रा त्याने हाती घेतली आहे. मुंबईत येवून तो नीता अंबानी,अक्षय कुमार, सोनू सूद यांची या कामी भेट घेणार आहे. शिवाय दिल्ली येथे केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात निवेदन देणार आहे. प्रत्येक महिलेला सॅनिटरी पॅड मोफत मिळावेत हा त्याचा प्रयत्न आहे.
गेल्या महिन्यात तो पटना येथून मुंबईसाठी पायी निघाला आहे. तो ज्या ठिकाणाहून चालत येत आहे त्या ठिकाणच्या प्रशासनाला निवेदन देत आहे. त्यात महिलांना मोफत सॅनिटरी पॅड द्यावेत ही मागणी करत आहे. यासाठी तो हजारो किलोमिटर चालत आहे. त्यातून तो लोकांमध्ये जनजागृतीही करत आहे. जे लोक भेटतील त्यांना या मोहिमेची माहितीही देत आहे. या कामी तो निता अंबानी यांनाही भेटणार आहे. त्यांनी या मोहिमेत पुढाकार घ्यावा अशी त्याची इच्छा आहे.
ट्रेंडिंग बातमी - तलवार गँगची दहशत, धुमाकूळ घालतानाचा सीसीटीव्ही आला समोर
मासिक पाळीमुळे महिलांना वेगवेगळे आजार होतात. त्याचे वाईट परिणाम महिलांना भोगावे लागतात. देशात अशा भरपूर महिला आहेत, ज्यांना सॅनिटरी पॅड विकत घेता येत नाहीत. त्यामुळे त्यांना अशा आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळेच या तरुणांने सर्वांना आवाहन केले आहे की सर्वांनी पिरेड संदर्भात आपली आपली चुप्पी तोडावी व या मोहिमेला सपोर्ट करावा असे आवाहन त्यांने केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world