नागपूर शहरात सध्या तलवार गँगची दहशत दिसत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण पोलिसांसमोर दिवसा ढवळ्या उत्पात माजविणाऱ्या तलवार गँगचे आव्हान उभे ठाकले आहे. नुकतेच कन्हान येथील एका बारमध्ये या गुंडांनी धुमाकूळ घातला. हातात तलवारी घेवून त्यांनी या बारमध्ये दहशत माजवली. त्यावेळीची सर्व दृष्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तलवार गँगने केलेल्या हल्ल्याचा थरार सीसीटीवी फुटेजमध्ये थरार दिसून आला आहे. कन्हान येथील योग बार अँड रेस्टॉरंटमध्ये दिवसा ढवळ्या तलवारी आणि लाठ्या काठ्या घेऊन गुंड अचानक शिरले. या गुंडांनी बारमध्ये दहशत माजवली. तिथे बसलेल्या ग्राहकांना बारच्या मागील भागात पळून जाऊन आश्रय घ्यावा लागला.
बार रेस्टॉरंटचे संचालक दीनदयाल बावनकुळे यांच्यावर या गुंडांनी हल्ला चढवला. शिवाय बारमध्ये तोडफोड केली. त्यांनी पार्किंग परिसरात असलेल्या लोकांना सुद्धा धमकावले. तिथे ठेवलेल्या गाड्यांची सुध्दा मोडतोड केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून गुंडांचा तपास सुरू आहे. पुणे, पिपरी चिंचडवमध्ये कोयत्या गँगची दहशत आहे. त्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. तसाच प्रकार नागपूरमध्येही अनुभवायला मिळाला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world