PSI चं अवैध मद्य विक्रेत्यांसोबत पोलीस स्टेशनमध्ये वाढदिवसाचं सेलिब्रेशन, वरिष्ठांकडून मिळालं 'गिफ्ट'

Nashik News : वणी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार कोठावळे यांचा वाढदिवस दोन दिवसापूर्वी पोलीस ठाण्यात साजरा करण्यात आला.

Advertisement
Read Time: 2 mins

नाशिकमध्ये पोलीस उपनिरीक्षकांचा वाढदिवस अवैध मद्य विक्रेत्यांकडून साजरा करण्यात आला आहे. नाशिकच्या वणी पोलीस स्थानकातील वाढदिवस सेलिब्रेशनची चर्चा जिल्हाभर होत आहे. आता याची वरिष्ठांनी दखल घेतली असून पोलीस उपनिरीक्षकास नियंत्रण कक्षात पाठवण्यात आले आहे.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

वणी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार कोठावळे यांचा वाढदिवस दोन दिवसापूर्वी पोलीस ठाण्यात साजरा करण्यात आला. या वाढदिवसाला अवैध मद्य विक्री करणारे व पुरवठा करणारे हे देखील उपस्थित होते. यातील काही जणांवर मद्य विक्री तसेच तस्करीबाबतचे गुन्हे दाखल आहेत. 

(नक्की वाचा - पूजा खेडकरांवर UPSC ची सर्वात मोठी कारवाई; गुन्हा दाखल, नोकरीवरही टांगती तलवार)

वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वरिष्ठांकडून याची दखल घेण्यात आली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक कोठावळे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. दरम्यान वाढदिवस ही वैयक्तिक बाब आहे, त्यामुळे पोलिसांनी आपला वाढदिवस पोलीस ठाण्यात सार्वजनिकरित्या साजरा न करता घरीच साजरा करावा, असा आदेश तात्कालिन नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी.जी.शेखर पाटील यांनी दिला होता.

(नक्की वाचा -  दादांचा आणखी एक आमदार शरद पवारांच्या गळाला? 'तो'आमदार कोण?)

पोलीस महानिरीक्षकांच्या या आदेशाला झुगारुन पोलीस ठाण्यातच पोलीस उपनिक्षकाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. याशिवाय  या वाढदिवसाला मद्य विक्रेते व पुरवठादार हजर राहिल्याने हा वाढदिवस पोलीस उपनिरीक्षकाला चांगलाच भोवला आहे.

Advertisement
Topics mentioned in this article