सूरज कसबे, प्रतिनिधी
Pune Shocking News : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकींची रणधुमाळी सुरु असतानाच पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. शहरातील प्रसिद्ध गोल्डन मॅन सनी वाघचौरे यांच्याकडे लॉरेन्स बिष्णोई गँगच्या नावाने 5 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. खंडणी न दिल्यास बाबा सिद्दिकींसारखी अवस्था करू आणि अंगावर सोन्यापेक्षा जास्त पितळ (गोळ्या) घालूस अशी धक्कादायक धमकी मेसेजद्वारे देण्यात आली आहे.
याप्रकरणी प्रसिद्ध गोल्डमॅन वाघचौरे यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात तक्रार अर्ज दाखल केला आहेमिळालेल्या माहितीनुसार, 25 जानेवारी रोजी सनी वाघचौरे यांना कॅनडातील एका क्रमांकावरून व्हॉट्सअप कॉल आला. फोन करणाऱ्याने स्वतःची ओळख बिष्णोई गँगचा सदस्य शुभम लोणकर अशी करून दिली. गुगलवर सर्च कर बिष्णोई गॅंग कोण आहे बाकी तुला मेसेजवर सांगतो, असं म्हणत त्याने फोन कट केला.
नक्की वाचा >> Ajit Pawar Death: ट्रॅफिकमुळे 'तो' निर्णय घ्यावा लागला अन् होत्याचं नव्हतं झालं, त्या दिवशी काय घडलं?
धमकीचा मेसेज आणि अल्टिमेटम
26 जानेवारी रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास वाघचौरे यांना पुन्हा कॅनडाच्या क्रमांकावरून एक मेसेज आला.या मेसेजमध्ये म्हटलं होतं की,"राम राम..मी शुभम लोणकर,लॉरेन्स बिष्णोई ग्रुपमधून बोलतोय.तुझ्याकडून 5 कोटी हवे आहेत. तुला जगातील कोणतीही ताकद वाचवू शकत नाही.तुझ्याकडे 5 दिवसांचा वेळ आहे.गोळी कुठूनही येऊ शकते.जर उत्तर दिले नाही तर तुझी अवस्था बाबा सिद्दिकींसारखी करू.जेवढे सोने तू घालतोस,त्यापेक्षा जास्त पितळ शरीरात भरू".
नक्की वाचा >> जगातील 5 सर्वात सुरक्षित प्रायव्हेट जेट, VVIP लोकांचाही आहे विश्वास; PM मोदी, मस्क, रोनाल्डोंचाही समावेश
पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाकडून तपास सुरु
या गंभीर प्रकारानंतर सनी वाघचौरे यांनी तातडीने पोलीस आयुक्तांकडे धाव घेत तक्रार दिली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.हा फोन खरोखरच बिष्णोई गॅंगकडून आला आहे की कोणाकडून खोडसाळपणा झाला आहे,याचा तपास पोलीस करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world