Worlds safest private jets : राज्याचे उपमुख्यमंत्री काल बुधवारी विमान अपघाताचा बळी ठरले. या दुर्घटनेत एकूण 5 जणांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून टाकले.त्यानंतर अजित पवार यांच्या विमानाची ( Learjet‑45) तुफान चर्चा रंगली. हे विमान जगातील सर्वाधिक लोकप्रिय खासगी जेट्सपैकी एक मानले जाते.सुरक्षा,वेग आणि विश्वासार्हतेच्या बाबतीत जगातील मोठमोठे नेते आणि अब्जाधीश उद्योजक सामान्य विमानांवर अवलंबून राहत नाहीत.जगात असे काही प्रायव्हेट चार्टर आहेत, जे सुरक्षेच्या बाबतीत अव्वल आहेत. जगातील 5 सर्वात सुरक्षित आणि विश्वासार्ह खासगी विमाने, ज्यांच्यावर व्हिआयपी (VIP) सर्वाधिक विश्वास ठेवतात,जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
1. Gulfstream G650ER (द किंग ऑफ स्काय)
हे विमान प्रायव्हेट एव्हिएशनचे ‘गोल्ड स्टँडर्ड'मानले जाते. एलन मस्क आणि जेफ बेझोस यांसारखे दिग्गज उद्योजक हाच जेट वापरतात. यात ‘सिमेट्री फ्लाइट डेक' बसवलेले आहे. जे पायलटला खराब हवामानात किंवा अंधारातही जमिनीचे स्वच्छ दृश्य दाखवते. हे जेट 51,000 फूट उंचीवर उडते. जिथे हवामान अत्यंत स्थिर असते आणि कमर्शिअल विमानांचे ट्रॅफिक जवळजवळ नसते. याची रेंज 13,900 किलोमीटर आहे. म्हणजेच हे विमान दिल्लीहून न्यूयॉर्कपर्यंत न थांबता उड्डाण करू शकते.भारतातील गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्या ताफ्यातही गल्फस्ट्रीमचे आधुनिक मॉडेल समाविष्ट आहेत.
नक्की वाचा >> Ajit Pawar Death : राज्याचा पुढील अर्थसंकल्प कोण सादर करणार? 'या' 3 नेत्यांची होतेय चर्चा
2. Dassault Falcon 8X (तीन इंजिनांवर विश्वास)
फ्रेंच कंपनी डसॉल्टचे हे विमान त्यांच्या श्रेणीनुसार जगातील सर्वात सुरक्षित जेट मानले जाते. या विमानात असणारे तीन इंजिन ही त्या विमानाची सर्वात मोठी ताकद आहे.उड्डाणादरम्यान एक इंजिन निकामी झाले तरी,उरलेल्या दोन इंजिनांच्या बळावर हे जेट सहजपणे लांब अंतर पार करू शकते आणि सुरक्षित लँडिंगही करू शकते.हे विमान अतिशय छोटे,अवघड किंवा मर्यादित रनवेवरही उतरू शकते. जे इतर जड जेट्ससाठी अशक्य असते.त्याची रेंज 11,945 किलोमीटरपेक्षा अधिक आहे.ज्यामुळे हे जगभरातील अनेक लांब पल्ल्यांच्या मार्गांवर सहजपणे उडू शकते. टाटा समूहाचे माजी चेअरमन रतन टाटा स्वतः एक अनुभवी पायलट राहिले आहेत आणि ते अनेकदा डसॉल्ट फाल्कन मालिकेतील विमानांचा वापर करत असत.तसेच मुकेश अंबानी यांच्या ताफ्यातही ‘फाल्कन 900' आणि ‘8X' यांसारखी मॉडेल्सचा समावेश आहे.
3) Bombardier Global 7500 (स्मूथ राइड)
Bombardier Global 7500 विमान ‘स्मूथ राइड' तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध आहे, जे जोरदार वारा असतानाही झटके जाणवू देत नाही. यात ‘Pur Air' सिस्टम आहे,जे केबिनमधील हवा दर 90 सेकंदांनी ताजी आणि जंतुमुक्त करते.त्याची प्रगत एव्हिऑनिक्स प्रणाली पायलटला आधीच इशारे देऊन विमानाला कोणत्याही संभाव्य दुर्घटनेपासून वाचवण्यास मदत करते. हे जगातील सर्वात मोठे आणि सर्वात लांब पल्ल्याचे बिझनेस जेट आहे. यात मास्टर बेडरूम आणि फुल-साइज किचनही असते.याची रेंज सुमारे 14,260 किलोमीटर आहे. अमेझॉनचे मालक जेफ बेझोस आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांसारखे दिग्गज या विमानावर विश्वास ठेवतात.
नक्की वाचा >> SJ-100 विमानाची भारतात एन्ट्री! देशात बनणार सुपरजेट, काय आहे या विमानाची खासीयत? वाचा सर्व माहिती
4) Embraer Phenom 300E (लाइट जेटचा चॅम्पियन)
हे विमान सलग अनेक वर्षांपासून जगातील सर्वाधिक विकले जाणारे लाइट जेट म्हणून ओळखले जाते. छोटे दौरे आणि अल्प-उड्डाणांसाठी हे व्हिआयपी लोकांची पहिली पसंती आहे. हे जगातील पहिले असे बिझनेस जेट आहे,ज्यामध्ये ROAAS (Runway Overrun Awareness and Alerting System)बसवलेले आहे. ही तंत्रज्ञान प्रणाली पायलटला आधीच चेतावणी देते की रनवे लँडिंगसाठी पुरेसा आहे की नाही. लहान आकार असूनही याची वेग क्षमता मोठ्या जेट्सला टक्कर देते. याची रेंज सुमारे 3,723 किलोमीटर आहे. फुटबॉल सुपरस्टार क्रिस्टियानो रोनाल्डो आणि ब्राझिलचा स्टार खेळाडू नेमार हे दोघेही या लाइट जेटचा वापर करतात. हे जेट लहान रनवेवर सहज उतरण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे,ज्यामुळे हे खेळाडू छोटे शहरांमध्येही सहज पोहोचू शकतात.
5) Airbus Corporate Jet (ACJ319neo), 12,500 किलोमीटरपर्यंतची रेंज
अनेक देशांचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान,जसे की जर्मनी आणि इटलीचे नेते,या मॉडेलच्या लष्करी आवृत्त्यांचा वापर करतात. हे जेट कमर्शियल एअरलाइनरच्या बॉडीवर आधारित असल्यामुळे त्याची चाचणी लाखो तासांच्या उड्डाणांमध्ये केली गेली आहे. म्हणजेच त्याचा सुरक्षाविषयक इतिहास अत्यंत मजबूत आहे. यामध्ये आधुनिक फायर प्रोटेक्शन सिस्टम आणि कोलिजन अवॉइडन्स (टक्कर टाळण्यासाठीचे तंत्रज्ञान) बसवलेले असते.
त्याचे केबिन इतके मोठे असते की त्यात एक पूर्ण कॉन्फरन्स रूम आणि डायनिंग एरिया सहज बनवता येतो.या जेटची रेंज 12,500 किलोमीटरपर्यंत आहे,ज्यामुळे हे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अत्यंत उपयुक्त ठरते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world