अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळाले? देवेंद्र फडणवीसांनी यादीच वाचली

Union Budget 2024 : केंद्रीय अर्थसंकल्पातून राज्याला काहीच मिळालं नाही. महाराष्ट्रावर अन्याय झाल्याची टीका, महाविकास आघाडीकडून सुरु झाला आहे. या टीकेला देखील देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

Advertisement
Read Time: 2 mins

कंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प संतुलित असून देशातील युवा, गरीब आणि शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. पायाभूत सुविधांसाठी मोठी गुंतवणूक करण्याची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. विरोधकांकडून मात्र चुकीचं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होत आहे, अशी टीका राज्याची उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

केंद्रीय अर्थसंकल्पातून राज्याला काहीच मिळालं नाही. महाराष्ट्रावर अन्याय झाल्याची टीका, महाविकास आघाडीकडून सुरु झाला आहे. या टीकेला देखील देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. ज्यांना अर्थसंकल्पातील काहीच कळत नाही अशांसाठी हा सोप्या भाषेतला अर्थसंकल्प.अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं याची यादीच देवेंद्र फडणवीसांनी मांडली. भाजपने याबाबत ट्वीट केलं आहे. 

(नक्की वाचा- Budget 2024 : "महाराष्ट्रावर अन्याय केला", महाविकास आघाडीच्या खासदारांचं संसदेबाहेर आंदोलन)

- विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प: 600 कोटी
- महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार: 400 कोटी
- सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक कॉरिडॉर: 466 कोटी
- पर्यावरणपूरक शाश्वत कृषि प्रकल्प: 598 कोटी
- महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प: 150 कोटी
- MUTP-3 : 908 कोटी
- मुंबई मेट्रो: 1087 कोटी
- दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर: 499 कोटी
- MMR ग्रीन अर्बन मोबिलिटी: 150 कोटी
- नागपूर मेट्रो: 683 कोटी
- नाग नदी पुनरुज्जीवन: 500 कोटी
- पुणे मेट्रो: 814 कोटी
- मुळा मुठा नदी संवर्धन: 690 कोटी

( नक्की वाचा - Budget 2024: बिहार, आंध्र प्रदेशला भरभरून, महाराष्ट्राच्या पदरात काय ?)

यादी बरीच मोठी आहे. बजेट संपूर्णपणे न वाचता उचलली जीभ लावली टाळ्याला या विरोधकांच्या वृत्तीला हे उत्तर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी महाराष्ट्राला कायमच प्राथमिकता दिली आहे. विरोधक कोणत्याही गोष्टीचा पाठपुरावा न करता फक्त राज्यातल्या जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका भाजपने केली आहे.