Vasai Virar Politics: वसई-विरारमध्ये भाजपला खिंडार! ॲड. साधना धुरी यांचा 'बविआ'त प्रवेश

Vasai Virar Politics: वसई-विरारमध्ये भाजपच्या जिल्हा सचिव ॲड. साधना धुरी यांनी भाजपला रामराम ठोकत हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली बहुजन विकास आघाडीत जाहीर प्रवेश केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

वसई-विरारमध्ये भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा गळती लागली आहे. भाजपच्या जिल्हा सचिव तथा महिला मोर्चा विधानसभा प्रमुख ॲड. साधना धुरी यांनी पक्षाचा राजीनामा देऊन माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत बहुजन विकास आघाडीत (BVA) प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे भाजपच्या संघटनात्मक ताकदीला स्थानिक पातळीवर मोठा तडा गेल्याचे मानले जात आहे.

धुरी यांचा गंभीर आरोप

पक्षप्रवेशावेळी बोलताना ॲड. साधना धुरी यांनी भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर कडाडून टीका केली. भाजपमध्ये सध्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जात असून, त्यांच्या संघर्षाची कदर केली जात नाही, असा दावा त्यांनी केला. "खरे संघर्ष योद्धा हे माजी आमदार हितेंद्र ठाकूरच आहेत," असे म्हणत त्यांनी बविआच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त केला. तसेच त्यांनी विद्यमान आमदार स्नेहा दुबे यांच्यावरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

(नक्की वाचा-  Kalyan News: "आई-बाबा त्रास करुन घेऊ नका..." बारावीच्या विद्यार्थिनीने संपवलं जीवन; सुसाईड नोटही सापडली)

राजकीय गणिते बदलणार?

साधना धुरी या वसई-विरार परिसरात त्यांच्या संघटन कौशल्यासाठी आणि जनसंपर्कासाठी ओळखल्या जातात. महिला आघाडीतील महत्त्वाचे पद भूषवणाऱ्या धुरी गेल्यामुळे भाजपच्या महिला मतदारांच्या फळीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.  दुसरीकडे, बविआला लागलेली गळती थांबवून हितेंद्र ठाकूर यांनी भाजपच्या गोटात शिरकाव केल्याने बविआच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

(नक्की वाचा-  Mumbai News: नागरिकांच्या जीवाशी खेळ; फळांना उंदीर मारायचं औषध लावणाऱ्या फळविक्रेत्याचा VIDEO व्हायरल)

या पक्षप्रवेशावेळी बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर, महापौर अजीव पाटील आणि इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. महापौरांनी धुरी यांच्या येण्याने पक्षाला बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. 

Advertisement
Topics mentioned in this article