जाहिरात

Kalyan News: "आई-बाबा त्रास करुन घेऊ नका..." बारावीच्या विद्यार्थिनीने संपवलं जीवन; सुसाईड नोटही सापडली

Kalyan News: कल्याणच्या कोळसेवाडी परिसरात बारावीत शिकणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थिनीने परीक्षेच्या भीतीपोटी आत्महत्या केली. "आई-बाबा, मी गेल्यावर त्रास घेऊ नका" अशी चिठ्ठी तिने लिहून ठेवली आहे.

Kalyan News: "आई-बाबा त्रास करुन घेऊ नका..." बारावीच्या विद्यार्थिनीने संपवलं जीवन; सुसाईड नोटही सापडली

कल्याण पूर्व येथील कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 17 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने राहत्या घरी आत्महत्या केली आहे. ही तरुणी एका नामांकित महाविद्यालयात 'बारावी कॉमर्स'मध्ये शिक्षण घेत होती. सध्या सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेत आपल्याला अपयश येईल, आपण उत्तीर्ण होणार नाही, या प्रचंड मानसिक दडपणाखाली तिने हे टोकाचे पाऊल उचलले.

सुसाईड नोटमध्ये काय?

मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणीने एक चिठ्ठी  लिहून ठेवली होती. यामध्ये तिने आपल्या मनातील भीती आणि पालकांविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिने म्हटले आहे की, "मी गेल्यावर आई-बाबा त्रास करुन घेऊ नका..." या चिठ्ठीमुळे परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांवर असलेल्या मानसिक दबावाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

(नक्की वाचा-  Mumbai News: नागरिकांच्या जीवाशी खेळ; फळांना उंदीर मारायचं औषध लावणाऱ्या फळविक्रेत्याचा VIDEO व्हायरल)

कल्याणमध्ये आत्महत्येने पुन्हा खळबळ

काही दिवसांपूर्वीच एका तरुणाला कुत्रा चावल्यानंतर आपल्याला रेबीज होईल, या भीतीने त्याने आत्महत्या केली होती. त्यानंतर आता परीक्षेच्या भीतीने विद्यार्थिनीने उचललेल्या पावलामुळे "तरुण वर्गाला झाले तरी काय?" असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.

(नक्की वाचा-  Solapur News: गल्लीत कुस्ती, दिल्लीत दोस्ती! केंद्र सरकारकडून धैर्यशील मोहिते-पाटलांना मोठी जबाबदारी)

कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. ही आत्महत्या केवळ परीक्षेच्या भीतीतून झाली आहे की यामागे काही वैयक्तिक किंवा अन्य कारण आहे, या अंगाने पोलीस तपास करत आहेत.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com