श्वेता शालिनींना भाऊ तोरसेकरांची माफी का मागावी लागली? वाचा पडद्यामागची इनसाईड स्टोरी

ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकरांनी आपल्या प्रतिपक्ष चॅनलवरुन भाजपच्या पराभवावर टीका केली होती. मात्र महाराष्ट्र भाजपवर केलेली टीका महाराष्ट्र भाजपच्या मीडिया प्रभारी असलेल्या श्वेता शालिनी यांना चांगलीच जिव्हारी लागली.

Advertisement
Read Time: 2 mins

ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर आणि भाजपच्या मीडिया प्रभारी श्वेता शालिनी यांच्यातील वाद सध्या चांगलाच चर्चेत आहे. दोघांच्या वादात देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली आहे. श्वेता शालिनी यांना भाजपच्या वरीष्ठ नेत्यांच्या दबावामुळे एक पाऊल मागे हटावं लागलं आहे.  एका व्हिडीओवरुन तोरसेकर यांना श्वेता शालिनी यांनी कायदेशीर नोटीस पाठवली होती. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

मात्र भाजपातील वरीष्ठ नेत्यांकडून समज दिल्यानंतर श्वेता शालिनी यांना कायदेशीर नोटीस मागे घेतली आहे. याशिवाय श्वेता शालिनी यांनी भाऊ तोरसेकर यांची माफी देखील मागितली आहे.  

(नक्की वाचा - 18 व्या लोकसभा अधिवेशनाला आजपासून सुरुवात, पहिल्या दिवशी खासदारांचे शपथविधी पार पडणार)

फडणवीसांचा तोरसेकरांना फोन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाऊ तोरसेकर यांना फोन केल्याची माहिती देखील समोर येत आहे. दोघांमध्ये भाजपच्या राज्य मीडिया प्रभारी श्वेता शालिनी यांनी पाठवलेल्या कायदेशीर नोटीससंदर्भात चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांची एनडीटीव्ही मराठीला दिली. भाऊ तोरसेकरांना देवेंद्र फडणवीस यांनी भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे येत्या काळात दोघांची भेट होण्याची शक्यता आहे.

(नक्की वाचा- कल्याण लोकसभेत फेरनिवडणूक घ्यावी, ठाकरे गटाच्या वैशाली दरेकरांची मागणी)

काय आहे प्रकरण? 

झालं असं की, ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकरांनी आपल्या प्रतिपक्ष चॅनलवरुन भाजपच्या लोकसभेतील पराभवावर सखोल विश्लेषण केलं होतं. यामध्ये त्यांनी भाजपवर पदाधिकाऱ्यांना केलेल्या कामावर कठोर शब्दांत टीका केली होती. ही टीका महाराष्ट्र भाजपच्या मीडिया प्रभारी असलेल्या श्वेता शालिनी यांना चांगलीच जिव्हारी लागली. श्वेता यांनी भाजपविरोधातील आवाजांनाच पैशांचे वाटप केल्याचा आरोप भाऊ तोरसेकरांनी केला होता. यावरुन श्वेता शालिनी यांनी तोरसेकर यांना थेट लीगल नोटीस धाडली. तसेच त्यांच्यावर सोशल मीडियातून टीका देखील केली. 

Advertisement

मात्र प्रकरण महाराष्ट्र भाजपच्या अंगावर शेकताना दिसत असतानाच श्वेता शालिनी यांना भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी समज दिल्याची माहिती आहे. तसेच श्वेता शालिनी यांनी आपल्या ट्विटवरुनच ही कायदेशीर नोटीस मागे घेत असल्याचं सांगत स्पष्टीकरण दिलं. 

Topics mentioned in this article