18 व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन आज सोमवारपासून सुरू होत आहे. अधिवेशनाचं कामकाज पुढील 10 दिवस चालणार आहे. 17 व्या लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हंगामी अध्यक्ष भर्तृहरी महताब यांना शपथ देतील. हंगामी अध्यक्ष महताब हे नवनिर्वाचित खासदारांना शपथ देतील.
दहा दिवसांत एकूण आठ बैठका होतील. सर्वात आधी प्रोटेम स्पीकर भर्तृहरि महताब राष्ट्रपती भवनात जाऊन शपथ घेतली. यानंतर ते सकाळी 11 वाजता लोकसभेत पोहोचतील. अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसात (24-25 जून) प्रोटेम स्पीकर नव्या खासदारांना शपथ देतील. यानंतर 26 जून रोजी लोकसभा अध्यक्षाची निवड होईल.
कसा असेल संसद अधिवेशनाचा कार्यक्रम
24 जून- आज पहिल्या दिवशी 280 खासदारांना शपथ दिली जाईल
25 जून- दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या 264 खासदारांना शपथ दिली जाईल
26 जून - रोजी लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक
27 जून- राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांचे अभिभाषण
28 जून - रोजी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा
2 जुलै - रोजी पंतप्रधान मोदींचं लोकसभेत चर्चेला उत्तर
3 जुलै- रोजी पंतप्रधानांचं राज्यसभेत भाषण
संविधानाची कॉपी घेऊन संसदेत करणार प्रवेश...
इंडिया आघाडीचे सर्व खासदार एकतेचं प्रदर्शन करीत एकत्रितपणे संसदेत प्रवेश करतील. ते संसदेतील महात्मा गांधींच्या प्रतिमेजवळ एकत्र येतील. सर्व खासदार आपल्यासोबत संविधानाची कॉपी घेऊन संसदेत प्रवेश करतील.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world