भाजप आमदार आणि महायुतीचे समन्वयक प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रामदास आठवले यांच्या कार्यलयातून बोलत असल्याचंही धमकी देणाऱ्याने म्हटलं. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आमदार प्रसाद लाड यांना मनीष निकोसे नावाच्या इसमाने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. धमकी देत असताना आरोपीने प्रसाद लाड यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ देखील केली आहे.
(नक्की वाचा - INDIA मधील राहुल गांधींची जागा धोक्यात, ममतांच्या खांद्यावरुन लालूंची फायरिंग )
आमदार प्रसाद लाड यांनी याबाबत पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. त्यानंतर त्यानंतर देखील मनीष निकोसे नावाच्या व्यक्तीने आमदार लाड यांना पुन्हा एकदा धमकी दिली.
आपण केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या कार्यालयातून बोलतोय. तर कधी आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयातून बोलत असल्याचे हा व्यक्ती सांगत आहे. 2 हजार लोकांसह तुझ्यावर हल्ला करेन, असे या धमकीत आरोपीने म्हटले आहे.
(नक्की वाचा - लग्नाची पत्रिका नव्हे, धोक्याची घंटा! लिंकवर क्लिक करताच फोनचा ताबा जातो गुन्हेगारांकडे!)
सदर इसमाची कसून चौकशी करून त्याच्यावर धमकीचा गुन्हा दाखल करावा व त्यास अटक करावी, अशी विनंती आमदार प्रसाद लाड यांनी पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world