NMMC Mayor: नवी मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा! महापौर आणि उपमहापौरांची बिनविरोध निवड

NMMC Mayor Election: शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतल्याने भाजपच्या सुजाता पाटील यांची निवड बिनविरोध झाली. तर उपमहापौर पदासाठी शिंदे गटाने माघार घेतल्याने भाजपचे दशरथ भगत यांची बिनविरोध निवड झाली.

जाहिरात
Read Time: 2 mins

नवी मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणात आज भाजपची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली असून, सुजाता पाटील यांची महापौरपदी आणि दशरथ भगत यांची उपमहापौर पदी बिनविरोध निवड झाली आहे. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमध्ये सुरुवातीला रंगलेली चुरस अखेर माघारीने संपली आणि भाजपचा मार्ग मोकळा झाला.

राजकीय नाट्यानंतर बिनविरोध निवड

या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांच्यात थेट लढत होण्याची चिन्हे होती. शिवसेनेच्या वतीने महापौर आणि उपमहापौर अशा दोन्ही पदांसाठी नामांकन अर्ज दाखल करण्यात आले होते. नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीतील चुरस या निवडीतही पाहायला मिळेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या.

(नक्की वाचा-  Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या विमानाचा अपघात कसा झाला? धक्कादायक बाब आली समोर)

शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतल्याने भाजपच्या सुजाता पाटील यांची निवड बिनविरोध झाली. तर उपमहापौर पदासाठी शिंदे गटाने माघार घेतल्याने भाजपचे दशरथ भगत यांची बिनविरोध निवड झाली.

भाजपचे संख्याबळ आणि नाईक यांची रणनीती

111 सदस्यांच्या नवी मुंबई महानगरपालिकेत भाजपकडे 65 नगरसेवकांसह स्पष्ट बहुमत आहे. एका अपक्ष उमेदवाराच्या पाठिंब्यामुळे हे संख्याबळ 66 वर पोहोचले होते. भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांच्या रणनीतीमुळे ही निवडणूक बिनविरोध करण्यात भाजपला यश आले. या विजयामुळे नवी मुंबईतील महापालिकेची सत्ता पूर्णपणे भाजपच्या ताब्यात आली असून नाईक कुटुंबाचा बालेकिल्ला पुन्हा एकदा अभेद्य राहिल्याचे दिसून येत आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  Pune-Mumbai Expressway वरील टँकर हटवला मात्र कोंडी कायम; नव्या अडचणीमुळे पोलीसही हतबल)

नव्या महापौरांसमोर आव्हाने

नव्याने निवडून आलेल्या महापौर सुजाता पाटील या अनुभवी नगरसेविका आहेत. आता त्यांच्यासमोर आणि उपमहापौर दशरथ भगत यांच्यासमोर नवी मुंबईतील पायाभूत सुविधांचा विकास, पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापन,  सिडकोशी संबंधित भूखंडांचे विषय आणि इतर प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे आव्हान असणार आहे.
 

Topics mentioned in this article