BKC Crane Accident: बीकेसीमध्ये मोठी दुर्घटना! मेट्रो 2Bचे काम सुरू असताना 400 क्षमतेची क्रेन उलटली,पाहा VIDEO

BKC Crane Accident: मुंबईतील बीकेसी परिसरात मेट्रो लाइन 2बी च्या कामादरम्यान 400 क्षमतेची क्रेन उलटल्याने मोठी दुर्घटना घडली, वाचा सविस्तर बातमी.

जाहिरात
Read Time: 1 min
"BKC Crane Accident: बीकेसीमध्ये मोठा अनर्थ टळला"
ANI

BKC Crane Accident: मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात मेट्रो लाइन 2Bचे काम सुरू असताना तांत्रिक बिघाडामुळे 400 टन क्षमतेची मोबाइल क्रेन उलटल्याची घटना घडली आहे. बुधवारी (15 एप्रिल) एशियन हार्ट हॉस्पिटलजवळ हा अपघात घडलाय. क्रेनच्या मदतीने प्री-कास्ट बीम (सिमेंटचा खांब) उचलण्याचे काम सुरू होते, कंत्राटदाराकडून रात्रीच्या वेळेस काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. 'जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड' असे कंत्राटदार कंपनीचे नाव आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही.

बीकेसीमध्ये 400 क्षमतेची क्रेन उलटली, पाहा व्हिडीओ

Advertisement

प्रशासनाकडून तातडीचे उपाययोजना

घटनास्थळावरून क्रेन हटवण्यासाठी आणि रस्ता वाहतुकीसाठी लवकरात लवकर खुला करण्यासाठी एमएमआरडीएचे (MMRDA) वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. उलटलेली क्रेन सुरक्षितपणे बाजूला काढण्यासाठी 600 टन क्षमतेची दुसरी क्रेन मागवण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांशी चर्चा करून या भागातील वाहतूक इतर मार्गांवर वळवण्यात आली आहे. नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, याची काळजी घेतली जात आहे. नियमित वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक सुरक्षा मानके आणि तपासणीची अंमलबजावणी केली जात आहे.

(नक्की वाचा: Matheran News: माथेरानमध्ये रात्रीच्या वेळेस फिरताय? धडकी भरवणारा VIDEO समोर; स्थानिकांसह पर्यटकांमध्ये घबराट)