जाहिरात

Property Tax: ज्येष्ठ नागरिकांसाठी 30% मालमत्ता कर सवलत खरी की खोटी? BMC ने दिलं स्पष्टीकरण

BMC News: सोशल मीडियावर 'गृहनिर्माण धोरण-2025' अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मालमत्ता करात 30% सवलत मिळणार असल्याचा एक संदेश सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Property Tax: ज्येष्ठ नागरिकांसाठी 30% मालमत्ता कर सवलत खरी की खोटी? BMC ने दिलं स्पष्टीकरण
मुंबई:


BMC News: सोशल मीडियावर 'गृहनिर्माण धोरण-2025' अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मालमत्ता करात 30% सवलत मिळणार असल्याचा एक संदेश सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मेसेजमुळे अनेक ज्येष्ठ नागरिक सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रशासकीय विभाग कार्यालयांमध्ये (वॉर्ड) गर्दी करत आहेत. मात्र, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) हा संदेश पूर्णपणे बनावट (Fake) असल्याचे स्पष्ट केले आहे.

काय आहे सत्य?

महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या निवासी मालमत्तेच्या करात 30% सवलत देण्यासंदर्भात 'बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888' मध्ये कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे, नागरिकांनी या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि केवळ या चौकशीसाठी प्रशासकीय विभाग कार्यालयात येऊन आपला वेळ व शक्ती वाया घालवू नये, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. नागरिकांना नाहक त्रास होऊ नये, म्हणून BMC ने ही तातडीची सूचना जारी केली आहे.

सध्या, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या धोरणानुसार, केवळ 500 चौरस फुटांपेक्षा (square feet) पेक्षा कमी क्षेत्रफळाच्या निवासी मालमत्तांना 1 जानेवारी 2022 पासून करसवलत दिली जाते. याव्यतिरिक्त, माजी सैनिक, त्यांच्या वीरपत्नी (विधवा) आणि अविवाहित शहीद सैनिकांच्या कुटुंबियांनाही त्यांच्या एका मालमत्तेच्या करात (शासनाचे कर वगळून) सवलत देण्यात येते.

( नक्की वाचा : Mumbai School विलेपार्लेतील प्रसिद्ध शाळेच्या 3 मुलींसोबत स्कूल व्हॅन चालकाचे धक्कादायक कृत्य; काय आहे प्रकार )
 

या महत्त्वपूर्ण स्पष्टीकरणामुळे, ज्येष्ठ नागरिकांनी सोशल मीडियावर फिरणाऱ्या खोट्या संदेशांवर विश्वास न ठेवता, केवळ अधिकृत आणि विश्वसनीय माहितीवरच अवलंबून राहावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com