जाहिरात

Mumbai School विलेपार्लेतील प्रसिद्ध शाळेच्या 3 मुलींसोबत स्कूल व्हॅन चालकाचे धक्कादायक कृत्य; काय आहे प्रकार

Mumbai Vile Parle School : मुंबईतील विलेपार्ले परिसरातून एक धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे.

Mumbai School  विलेपार्लेतील प्रसिद्ध शाळेच्या 3 मुलींसोबत स्कूल व्हॅन चालकाचे धक्कादायक कृत्य; काय आहे प्रकार
Mumbai Vile Parle School : आरोपी चालकाने स्कुल व्हॅनमध्ये विद्यार्थिनींना बसवताना त्यांच्याशी गैरवर्तन केले. (प्रतिकात्मक फोटो)
मुंबई:

ऋतिक गणकवार, प्रतिनिधी

Mumbai Vile Parle School : मुंबईतील विलेपार्ले परिसरातून एक धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका नामांकित शाळेतील 3 शाळकरी विद्यार्थिनींचा स्कूल व्हॅन चालकाने विनयभंग केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पालकांनी तक्रार दाखल केल्यानंतर जुहू पोलिसांनी तातडीने तपास करत आरोपी चालकाला अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

या प्रकरणाबाबत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी चालकाने स्कुल व्हॅनमध्ये विद्यार्थिनींना बसवताना त्यांच्याशी गैरवर्तन केले आणि अश्लील वर्तन करत चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. या तिन्ही शाळकरी विद्यार्थिनींनी घरी जाऊन पालकांना या धक्कादायक प्रकाराची माहिती दिली.

आपल्या मुलींसोबत घडलेला हा प्रकार समजताच पालकांना प्रचंड धक्का बसला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या सांताक्रुझमधील एका विद्यार्थिनीच्या पालकानं तातडीने जुहू पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आरोपीविरोधात तक्रार नोंदवली. पालकांच्या या तक्रारीवरून जुहू पोलिसांनी तत्काळ विनयभंगाचा गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे फिरवली.

(नक्की वाचा : Vasai News : वसईत संताप! फक्त 5 मिनिटे उशीर, शिक्षिकेच्या क्रूर शिक्षेमुळे सहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू )
 

पोलिसांनी तक्रारीच्या आधारे आरोपी स्कूल व्हॅन चालकाला बेड्या ठोकल्या आहेत. अटक केल्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीने यापूर्वी आणखी कोणत्या विद्यार्थिनीचा विनयभंग केला आहे का, तसेच त्याच्यावर यापूर्वी कोणते गुन्हे दाखल आहेत का, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com