BMC News: मुंबई महापालिकेत नवं समीकरण; मनसे महायुतीत सामील होणार? पडद्यामागे काय घडतंय?

Mumbai News: राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप आणि शिंदे गटाकडे बहुमत असतानाही मनसेला सोबत घेण्यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला (UBT) मुंबईच्या राजकारणातून पूर्णपणे बाजूला सारणे हे महत्त्वाचे कारण आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai News: मुंबई महापालिकेचा महापौर कोण होणार आणि कधी होणार हा एक प्रश्न सध्या मुंबईकरांना पडला आहे. मुंबई महानगरपालिकेत सत्तास्थापनेचे समीकरण आता एका नव्या वळणावर येऊन पोहोचले आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने बहुमताचा आकडा पार केला असला तरी, राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेण्याच्या हालचाली पडद्यामागे वेगाने सुरू झाल्या आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला (UBT) राजकीय धक्का देण्यासाठी ही नवी 'महायुती' आकारास येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. महायुती अधिक भक्कम सत्तेसाठी राज ठाकरे यांच्या 6 नगरसेवकांना सोबत घेण्याबाबत महायुतीमध्ये सकारात्मक चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

'उबाठा' गटाला मोठा धक्का देण्याची रणनीती

राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप आणि शिंदे गटाकडे बहुमत असतानाही मनसेला सोबत घेण्यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला (UBT) मुंबईच्या राजकारणातून पूर्णपणे बाजूला सारणे हे महत्त्वाचे कारण आहे.  मनसेला सोबत घेतल्यास मराठी माणसाचा आवाज अधिक प्रभावीपणे मांडता येईल, असा महायुतीचा प्रयत्न आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मनसेच्या काही प्रमुख नेत्यांशी या संदर्भात गुप्त चर्चा केल्याचे समजते.

(नक्की वाचा- Mumbai Mayor Election 2026: मुंबई महापौरपदाची निवडणूक लांबणीवर! भाजपला कसा होणार फायदा?)

कोकण भवनात लवकरच गटनोंदणी

महापौरपदाची निवडणूक फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता असल्याने, तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्रित गट स्थापन करण्यासाठी कोकण भवनात जाणार असल्याची शक्याता आहे. मात्र मनसे प्रत्यक्ष सत्तेत सहभागी होणार की बाहेरून पाठिंबा देणार, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, त्यांच्या पाठिंब्यामुळे महायुतीचे पारडे अधिक जड होणार आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  Mumbai News: फेब्रुवारी अखेर दाखल होणार स्वयंचलित दरवाजांची लोकल , 'हे' फीचर खास)

मुंबई महापालिकेतील सद्यस्थिती 

  • भाजप - 89
  • शिवसेना (एकनाथ शिंदे)- 29 
  • शिवसेना (ठाकरे गट) - 65
  • मनसे - 6
  • काँग्रेस - 24  
Topics mentioned in this article